पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*विषय : .*मा. मुख्यमंत्री व मा. नौकानयन मंत्री आणि मा. लोकआयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार हनुमान कोळीवाडा गावाचे कायदेशीर पुनर्वसनासाठी लागणारी विकसीत जमिन व खर्चाचे अंदाजपत्रकाची रक्कम शासनाने जेएनपीटी कडून वसुल करण्यात दिरंगाई झाल्याच्या निषेधार्थ ०२ ऑक्टोबर २०२० रोजी उरण तहसिल कार्यालयावर, सकाळी १०.०० वाजता. गावातील बायका-पोरांसह एक दिवसाचे धरणे आंदोलन
महोदय,
*उरण :-* उपरोक्त विषयांकीत प्रकरणी पशासनाने मा. मुख्यमंत्री व मा. नौकानयन मंत्री यांच्या दि. २६ फेबुवारी २०१५ रोजी आणि मा. लोकआयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या दिनांक ११ जुलै २०१७ रोजीच्या आदेशानुसार जेएनपीटीच्या १७ हेक्टर विकसीत जमिनीत हनुमान कोळीवाडा गावातील सन १९८४ च्या शासनाच्या यादीतील ८६ शेतकरी व १७0 विगर शेतकरी अशा एकुन २५६ कुटुंबांचे त्या काळातील मंजूर कायदेशीर पुनर्वसन करण्यासाठी त्या विकसीत जमिनीवर नागरी सुविधा पुरविणेसाठी अंदाजित खर्चाची रक्कम रूपये ६२०.00 लक्ष कीमतीचे अंदाजपत्रक तयार करून दिनांक १९ जुलै २०१८ रोजी शासनाला पुढील कार्यवाहीसाठी पाठबिलेले आहे.
मा. जिल्हाधिकारी रायगड यांच्या दिनांक १९ जानेवारी २०१२ रोजीच्या अहवालातील प्रस्ताव क ३ मधील परिच्छेद २ मध्ये सध्याच्या हनुमान कोळीवाडा गावात असलेली १७२ घरे व २१ घरांचे जोते बगैरे बगैरे यांच्या मुल्यांकनाची रक्कम देण्याचे निश्चित केलेले आहे. हनुमान कोलीवाडा गावाचे कायदेशीर पुनर्वसनासाठी लागणारी विकसित जमिन व खर्चाचे अंदाजपत्रकाची रक्कम शासनाने जेएनपीटी कडून बगुल करण्यात दिरंगाई झाल्याच्या निषेदार्थ तहसिल कार्यालयात दिनांक 0२ ऑक्टोबर २०२0 रोजीच्या गांधी जयंती दिनी गावातील सर्व ग्रामस्थांनी एकमताने निर्णय बेऊन बायकापोरांसह
एक दिवसाचे धरणे आंदोलन करत आहोत. गेल्या ३५ वर्ष पुनर्वसनाचा छळ असहय झालेला आहे त्याने
सहनशिलतेचा ही अंत झालेला आहे. कारणे पुनर्वसीतांच्या हातून कोणताही विचीत्र प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण
जबाबदारी आपणावर राहील ही विनंती.
प्रत :-
१) मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब, नगर विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई.
२) मा. आयुक्त कोकण विभाग, कोकण भवन, सीबीडी बेलापुर. ३) मा. श्रीमती निधी चौधरी, जिल्हाधिकारी रायगड,रायगड-अनिवाग,
४) मा. श्री. दत्तात्रेय नवाळे साहेब, उपविभागिय अधिकारी, पनवेल.
५) मा. तहसिलदार साहेब, तहसिल कार्यालय, उरण.
६) मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, न्हावा शेवा पोलीस स्टेशन, उरण,
७) मा. बरीष्ठ पोलीस निरीक्षक, उरण पोलीस स्टेशन, उरण.