यामुळे भा.ज.पा. नेत्यांच्या संस्कारावरच प्रश्नचिन्ह; रोहित पवार

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



पुणे :- हाथरसमधील सामूहिक अत्याचाराच्या घटनेवर जनक्षोभ उमटत असतानाच भा.ज.पा.च्या आमदारांनं बलात्कार थांबवण्यासाठी मुलींवर संस्कार करणं गरजेचं असल्याचं वक्तव्य केलं होतं. 


या वक्तव्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही यावरून भा.ज.पा.ला टोला लगावला आहे. 


उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या संदर्भानं बोलताना भा.ज.पा. आमदाराने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. 


चांगले संस्कारच बलात्कार रोखू शकतात असं भा.ज.पा.चे बलियाचे आमदार सुरेंद्र सिंह म्हणाले होते. 


भा.ज.पा. आमदारानं केलेल्या वक्तव्याच्या हवाला देत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी भा.ज.पा.ला लक्ष्य केलं आहे. 


रोहित पवार यांनी एक ट्विट करून म्हटलं आहे, 


“‘मुलींवर चांगले संस्कार केले, तर बलात्कार होणार नाहीत ?’, 


असं बेताल वक्तव्य उत्तर प्रदेशातील भा.ज.पा.च्या एका आमदार महाशयांनी केलं. 


एकीकडं आपल्या महान भारतीय संस्कृतीचा गौरव जगभरात होत असताना अशा लोकप्रतिनिधींकडून तोडल्या जाणाऱ्या ताऱ्यांमुळं त्यांच्यावरील संस्कारांबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण होतं,


” अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.


 ‘मुलींवर चांगले संस्कार केले तर बलात्कार होणार नाहीत’, असं बेताल वक्तव्य U.P. तील भा.ज.प.च्या एका आमदार महाशयांनी केलं. 


एकीकडं आपल्या महान भारतीय संस्कृतीचा गौरव जगभरात होत असताना अशा लोकप्रतिनिधींकडून तोडल्या जाणाऱ्या ताऱ्यांमुळं त्यांच्यावरील संस्कारांबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण होतं. 


 नेमकं काय म्हणाले होते सुरेंद्र सिंह ? 


“मी फक्त एक आमदार नाही तर एक चांगला शिक्षकही आहे.


 त्यामुळे मी हे सांगतो आहे की आपल्या मुलींवर चांगले संस्कार घडवा.