प्रारूप मतदान केंद्राच्या यादीबाबत हरकती व सूचना पाठवाव्यात

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



 पुणे,दि.20 :-पुणे जिल्हा शिक्षक व पदवीधर मतदार संघाची निवडणूक-२०२० साठी निश्चित करण्यात आलेल्या प्रारूप मतदान केंद्रांच्या यादीबाबत उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी तहसीलदार प्रशांत पिसाळ, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, शिक्षक आणि पदवीधर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. पुणे जिल्हा शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या प्रारूप मतदान केंद्रांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ pune.nic.in उपविभागीय अधिकारी, तहसिल कार्यालय यांच्या नोटीस बोर्डवर दिनांक १५ ऑक्टोबर २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी निरीक्षणासाठी तसेच मतदारांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रारूप मतदान केंद्राच्या यादीबाबत पुणे जिल्हाच्या हद्दीतील हरकती व सूचना असल्यास त्या प्रारूप मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध झाल्याच्या दिनांक पासून ७ दिवसांपर्यंत म्हणजे दिनांक २२ऑक्टोबर २०२० पर्यंत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पुणे यांच्याकडे पाठवाव्यात. 


0000