अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला तीन वर्षांची सक्तमजुरी...

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


..


अलिबाग  : शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्याला अलिबागच्या मे.विशेष न्यायालयाने तीन वर्षे सक्त मंजुरीची शिक्षा सुनावली. दिपक जनार्दन पाटील असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर घटना ७ ऑगस्ट २०१८ रोजी पेण तालुक्यातील कुंभारवाडी येथे घडली होती. आरोपी दिपक हा पिडित अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करत होता. पिडित मुलगी आपल्या मैत्रिणीसह क्लासला चालली होती , यावेळी आरोपीने तिचा हात पकडला, आणि तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पेण पोलिस स्थानकात आरोपी विरोधात तक्रार नोंदवली. त्यानुसार भा.द.वि. कलम ३५४ आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपीविरोधात मे.विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी विषय सत्र न्यायाधीश श्रीमती एस.एस .शेख यांच्या न्यायालयात झाली. यावेळी सरकारी अभियोक्ता म्हणून अश्विनी बांदिवडेकर पाटील यांनी काम पाहिले. सुनावणीदरम्यान सहा साक्षीदारांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या. यात पीडित मुलगी तिची मैत्रीण तिचा भाऊ तपासी अंमलदार यांची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मे.न्यायालयानेही सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राय्ह धरला, आणि आरोपी दिपक जनार्दन पाटील यास पंधरा हजार रुपयांचा दंड आणि तीन वर्षांची सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतील दहा हजार रुपये पीडित मुलीला देण्याचे आदेश मे.न्यायालयाने दिले.