लवळे येथिल भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्याने तयार केलेला “रोंग टर्न” हा अँड्रॉइड गेम गुगल प्लेस्टोअर वर उपलब्ध

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



पुणे :- अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पारंपारिक पद्धतिने व विद्यापीठाने नेमून दिलेल्या अभ्यासक्रमा प्रमाणे होत असते. या सर्व शिक्षणाचा उपयोग फक्त चांगली नोकरी कशी मिळेल या साठी ना करता थोड्या कल्पकतेने वेगवेगळ्या पद्धतीने कसा करता येईल याचा विचार प्रत्येक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने करायला हवा. अशाच विचारातून राम भोंगळे या लवळे,पुणे येथिल भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक विभागात चतुर्थ वर्षात शिकणाऱ्या एका ग्रामीण विभागातील विद्यार्थ्याने “रोंग टर्न” नावाच्या आकर्षक मोबाईल गेम ची निर्मिती केलेली आहे.


  रामला लहानपणा पासूनच मोबाईल गेमचे आकर्षण होते, पुढे या आवडीतूनच त्याने आपण ही अशा प्रकारचा गेम तयार करण्याचा ध्यास मनात घेतला. ही गेम तयार करण्यासाठी त्याने C#


या प्रोग्रामिंग भाषेचा तसेच ३D मोडेलिंग साठी “Blender” सारख्या सोफटवेअरस ची संपूर्ण माहिती घेऊन त्याचा उपयोग गेम तयार करण्यासाठी केला. यासाठी त्याला संगणक विभागातील प्राध्यापकांनी ही मोलाचे मार्गदर्शन व वेळोवेळी प्रोत्साहित केले.


ही गेम सध्या कन्सोल व गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे व लवकरच ॲपल स्टोअर वर ही उपलब्ध होईल. गेमच्या आकर्षक रचनेमुळे व उत्कृष्ठ ग्राफिक्समुळे अल्पावधीतच शेकडो लोकांनी ही गमे खेळली आहे व अनेकांनी ५ स्टार रेटिंगही दिलेले आहेत.आपणही सोबत दिलेल्या लिंक (https://play.google.com/store/apps/details?id=com.Tonakai.WrongTurn) वरून गेम डाउनलोड करून खेळण्याचा आनंद घेऊन विद्यार्थ्याच्या या प्रयत्नाला प्रोत्साहीत करावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एन.पाटील यांनी केले आहे.