सुतारवाडी स्मशानभूमीमधील चेंबरची झाकणे बदलण्यासंदर्भात.. 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



पुणे :- सुतारवाडी स्मशानभूमीमधील गटार लाइनीचे अनेक चेंबरची झाकण गेली अनेक दिवस झाली तुटलेल्या अवस्थेत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने हा चेंबर जर पाण्याने भरला तर काहीच कळून न येता येथे नागरिक पडून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 


सुतारवाडी स्मशानभुमीमध्ये प्रेतयात्रा नेताना अनावधानाने प्रेतयात्रेतील खांदेकऱ्यांचा पाय चेंबर मध्ये गेल्यास त्याच्या खांद्यावरील प्रेत जमिनीवर पडायचे व त्यामुळे नागरिक चिडून जातील. काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते कै. शांताराम तोंडे यांच्या सावडनेच्या विधी वेळी एक ज्येष्ठ नागरिकांच्या (रणपिसे ) पायास या तुटलेल्या चेंबरमुळे दुखापत झाली आहे अश्या अनेक कारणामुळे येथील नागरिकांनी आपल्या सुतारवाडी हद्दीतील मुकादम रणदिवे व आपल्या कार्यालयात येऊन तक्रारी दिल्या आहेत, परंतु आपल्या कार्यालयाकडून कसल्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याने येथील रहिवाश्यांनी या परिस्थितीला कंटाळून आमच्या कार्यालयात येऊन तक्रारी केल्या आहेत. 


तरी एखादा मोठा अपघात होण्याची वाट न पाहता येथील संपूर्ण चेंबरची झाकण त्वरित बदलावी अथवा दुरुस्त करावित हि विनंती.


जर येत्या ८ दिवसात चेंबरचे झाकण बदलले किंवा दुरुस्त केले नाही तर मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल. तसेच निवेदन दिल्यानंतर सदर ठिकाणी काही अपघात झाल्यास सर्वस्वी आपणास जबाबदार धरले जाईल याची आपण कृपया नोंद घ्यावी. अशाप्रकारचे निवेदन आज मंगळवार दिनांक १३/१०/२०२० रोजी महापालिका सहाय्यक आयुक्त औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय यांना देण्यात आले. 


सहकार्य असावे,                                    आपला राष्ट्रबांधव,                                सुहास भगवानराव निम्हण 


(अध्यक्ष शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ)