पुणे प्रवाह न्युज पोर्टल
कृपया प्रसिद्धी साठी
पुणे:१८:शिवसेनेचे माजी नगरसेवक स्व विजय मारटकर तसेच त्यांचे पुत्र स्व दीपक मारटकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते
या वेळी पुण्याचे खासदार गिरिशभाऊ बापट, पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे आरपीआय चे राष्ट्रीय निमंत्रक ऍड मंदार जोशी राष्ट्रवादीचे गणेश नलावडे मनसेचे गणेश भोकरे यांच्या सह सर्व मंडळाचे पदाधिकारी तसेच विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते
यावेळी बोलताना खासदार गिरीश बापट म्हणाले मारटकर कुटुंबीय सतत स्व विजय व दीपक मारटकर यांच्या माध्यमातून कार्यरत होते तळागाळातील लोकांसाठी दोघे ही झटत होते राजकीय मतभेद हे कोणाच्या जीवावर बेतू नये तसे झाले तर राजकारण हे खालच्या स्तरावर जाऊन पोहोचते या वेळी बापट यांनी मारटकर यांच्या आठवणींना उजाळा दिला
यावेळी बोलताना संजय मोरे म्हणाले की मारटकर यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा होईल अशी मागणी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे
स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले की मारटकर यांच्याशिवाय गणेश उत्सव पूर्ण होऊच शकत नाही विजय आणि दीपक मारटकर यांना एकाच वेळी श्रद्धांजली दयावी लागत आहे ही खरच दुर्दैवी बाब आहे
ऍड मंदार जोशी म्हणाले की आरोपीवर मोक्काची कारवाई व्हायला हवी तरच या गोष्टींना आळा बसेल
यावेळी गणेश नलावडे ,संजय देशमुख ,दत्ता सागरे ,बाळासाहेब आमराळे ,गणेश भोकरे ,राजू परदेशी तेजस गडाळे ,विलास मारटकर यांनी श्रद्धांजली वाहिली
या सभेचे आयोजन शिवसेना नेते राजेंद्र शिंदे ,दत्ता सागरे,राजेंद्र पवार सुरेश कांबळे यांनी केले यावेळी मारटकर कुटुंबातील राहुल आलमखाने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या