बांधकाम कामगारांच्या हितासाठी आमदार लक्ष्मण जगताप मैदानात ;थेट कामगार मंञ्यांना पञ 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


प्रसिद्धीसाठी... 



पिंपरी :-चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी बांधकाम कामगारांच्या प्रश्नांसाठी थेट महाराष्ट्राचे कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पञ पाठवले आहे. आमदार जगताप यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पुणे जिल्हा कामगार उपायुक्त कार्यालयातील कारभाराबाबत बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष जयंत शिंदे यांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांना असलेल्या कल्याणकारी योजनेचा लाभ मिळण्याकरिता पुणे जिल्हा कामगार उपायुक्त कार्यालयातील येणाऱ्या अडचणी व निष्क्रिय कारभाराबाबत स्वयंस्पष्ट येत असल्याचे दाखवून दिले होते.माञ त्यांच्या या मागण्यांकडे कामगार उपायुक्त लक्ष दिलेले दिसत नाही. 


पुणे जिल्हा कामगार उपायुक्त कार्यालयामार्फत अनेक बांधकाम कामगारांनी मोठ्या अपेक्षानी नोंदणी केली आहे . परंतु कामगारांच्या विविध लाभ आणि योजनेच्या अर्जावर कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यांना मिळण्यात येणाऱ्या विविध योजना जसे की, बांधकाम कामगारांच्या पाल्यास मिळणारा शैक्षणिक लाभ , महिलांना मिळणारा प्रसूती लाभ , मृत बांधकाम कामगारांच्या वारसांना अंत्यविधी अर्थ सहाय्य योजना , या लाभापासून वंचित राहावे लागत असल्याचे दिसून येते . बांधकाम कामगारांना नोंदणी करूनही अद्यापही स्मार्ट कार्ड उपलब्ध न होणे . 


कामगारांचे प्रशिक्षण पूर्ण होऊनही अद्यापही अनुदान व प्रशस्ती पत्र न मिळणे . एच एल.एल या संस्थे मार्फत प्रत्येक कामगाराचे १ ९ ५० रुपये अदा करून आरोग्य तपासणी केल्याची आठ महिन्यापासून वैद्यकीय अहवाल रिपोर्ट उपलब्ध न होणे , नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा संच अत्यावश्यक संच , अवजारे खरेदीसाठी अनुदान , व लॉकडाऊनच्या काळात जाहीर करूनही खात्यात रक्कम जमा न करणे तसेच कामगारांच्या विविध प्रश्नांसंबंधी कोणतीही ठोस कार्यवाही न करणेबाबत व पुणे जिल्हा कामगार उपायुक्त कार्यालयातील उदासीनता व निष्क्रिय कारभाराबाबत जयंत शिंदे यांनी लेखी स्वरूपात शासन दरबारी तक्रार केली. 


तरीही पुणे जिल्ह्यातील इमारत व इतर बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळाचा लाभ मिळण्याकरिता व येणाऱ्या अडी - अडचणी सोडविण्याबरोबरच कामगार उपायुक्त कार्यालयातील कारभार गतिमान व पारदर्शक होण्याकरिता आपल्या स्तरावर संबंधितांना योग्य त्या कार्यवाहीचे आदेश निर्गमित करावे व आपल्या सोयीने कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याकरिता लोकप्रतिनिधी समवेत पुणे येथे बैठकीचे आयोजन करावे अशा आशयाचे पत्र आमदार लक्ष्मण जगताप यांनी कामगार मंञ्यांना दिले आहे.