पोलीस वाहतूक उपायुक्तपदी राहुल श्रीरामे...

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 पोलीस वाहतूक उपायुक्तपदी राहुल श्रीरामे...


पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या उपायुक्तपदी राहुल श्रीरामे यांची नियुक्ती करण्याचे आदेश गृहविभागाने दिले. त्यानुसार, नवनियुक्त पोलीस उपायुक्त श्रीरामे यांनी वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तपदाचा पदभार स्विकारला. परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्तपदी प्रियंका नारनवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री गृहविभागाने दिलेल्या आदेशानुसार बदल्या करण्यात आल्या. पुणे शहर परिसरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून वाहतुकीला शिस्त लावणे तसेच वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. वाहतुकीच्या समस्या सोडविणे तसेच वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्याचे काम वाहतूक शाखेकडून करण्यात येत आहे. दरम्यान, शहर पोलीस दलातील दोन सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले. फरासखाना विभागाचे सहाय्यक आयुक्त मिलींद पाटील यांची विशेष शाखेत नियुक्ती करण्यात आली तसेच खडकी विभागातील सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांची गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे.