पुणे प्रवाह न्युज पोर्टल
शालेय व्यवस्थापक पदावरून अमित जोगळेकर यांना हटवा शिक्षकाचीमागणी
कर्जत,ता.13 गणेश पवार
कर्जत तालुक्यातील नेरळ-कळंब रस्त्यावर धामोते येथे नेरळ विद्या भवन नावाची माध्यमिक शाळा आहे.या शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे कोविड काळात शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी यांच्या सहविचार सभा आयोजित करीत आहेत.त्या सतत आयोजित होत असलेल्या सभांमुळे या माध्यमिक शाळेतील तिघांना कोरोना झाला असून ते आज मृत्यूशी झुंज देत आहेत.दरम्यान, शाळेच्या मुख्याध्यापिका यांचे अधिकार स्वतःकडे घेऊन शालेय वय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जे कोविड काळात शिक्षकांना सहविचार सभांना बोलवत आहेत,त्यामुळे अधिकार नसताना शिक्षकांवर अधिकार दाखविणाऱ्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमित जोगळेकर यांना पदावरून काढून टाकावे अशी मागणी तेथील एका शिक्षकाने त्या शाळेच्या संस्थेला आणि रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला केली आहे.
नेरळ विद्या भवन माध्यमिक विद्यालय, धामोते शाळेत वारंवार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गास शालेय कामकाजाच्या नावाखाली बोलावून सप्टेंबर महिन्यात या कालावधीत तब्बल सात सहविचार सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. शालेय व्यवस्थापक अमित मनोहर जोगळेकर हे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष असून त्यांच्याकडून अशा सभा आयोजित होऊ शकत नाहीत.त्यात कोविड मुळे शाळा बंद आहेत,मात्र अमित जोगळेकर हे सर्व शिक्षकांना सह विचार सभेत कोणाला कोरोना झाला आहे,कोरोना मुळे काय होते,आता अन लॉक आहे,कशाला कोरोना ची भीती बाळगता असे सतत बोलून सर्वांना बोलावून घ्यायच्या.या सहविचार सभांमुळे नेरळ विद्या भवन शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अशा तिघांना कोरोना झाला आहे.या तीनही पुरूष कर्मचाऱ्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांची मृत्यूशी झुंज चालू आहे.असे असताना देखील शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमित जोगळेकर हे शाळेच्या मुख्याध्यापिका यांचे अधिकार वापरून शासनाच्या परिपत्रकाचा अवलंब न करता 100% कर्मचारी उपस्थिती असावी असा अट्टाहास कायम ठेवला.
दरम्यान सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी वारंवार बैठक आयोजित करूनच आणि काही कारण नसताना सभेला बोलावून घेत असल्याने आपले सहकारी कोरोना बाधित झाले आहेत असा आरोप केला आहे.अमित जोगळेकर यांच्याकडून शाळेत सुरू असलेला मनमानी कारभार लक्षात घेऊन त्यांना शालेय व्यवस्थापक पदावरून हटविण्यात यावे अशी मागणी शाळेचे शिक्षक सचिन अभंगे यांनी केली आहे.याबाबतच्या मागणीचे निवेदन रायगड जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी, कोकण विभागीय शिक्षक आमदार बाळाराम पाटील,संस्थेचे मुख्य विश्वस्त रविंद्र आजगावकर यांच्याकडे सादर केले आहे.
अमित जोगळेकर-अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती
नारायण फेणाणि पब्लिक वेल्फेअर ट्रस्ट,मुंबई संस्थेचे मुख्य विश्वस्त रविंद्र आजगांवकर यांनी मला सर्व प्रशासकीय अधिकार दिलेले आहेत.