पोलिस हवालदार इक्बाल शेख, सी.सी.टी.एन.एस. विभाग

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


पोलिस हवालदार इक्बाल शेख,


सी.सी.टी.एन.एस. विभाग, 


सोलापूर ग्रामीण यांनी भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आयोजित केलेल्या सायबर सिक्युरिटी अवेयरनेस फेज -२ (सायबर गुंडगिरी) च्या ऑनलाइन परीक्षेत ९०% गुण मिळविले आहेत.


या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवलदार इक्बाल शेख, सी.सी.टी.एन.एस. विभाग, सोलापूर ग्रामीण यांना इन्फॉर्मेशन सिक्युरिटी एज्युकेशन अवेअरनेस (I.S.E.A.) समन्वय प्रकल्प व्यवस्थापक (C.D.A.C.) यांचेकडून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आल्याबद्दल महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी व मित्र परिवाराकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.