अवयव दान हे सर्वश्रेष्ठ दान....... प्राचार्य डॉ. एम.डी.लॉरेन्स

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


अवयव दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.


पुणे :- सद्य परिस्थिती मध्ये अवयव दाना बद्दल जनजागृती करणे ही काळाची गरज आहे. हे समाज उपयोगी काम विद्यार्थ्यांनी प्रेरित होऊन केले तर त्यामुळे भविष्यामध्ये अनेक लोकांना जीवनदान मिळू शकते” असे उद्गार फोरसाईट कॉलेज ऑफ कॉमर्सचे यांनी काढले. ते फोरसाईट कॉलेज ऑफ कॉमर्स(FCC) व मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स(MMCC) यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यामध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या “अवयवदाना बद्दलची जनजागृती” या आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये अध्यक्षपदावरून बोलत होते. 


मराठवाडा मित्र मंडळ चे कार्यकारी अध्यक्ष, प्राचार्य श्री बी.जी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.सदर परिसंवादामध्ये संयुक्त अरब अमिराती (UAE) विद्यापीठातून तसेच देशभरातील विविध महाविद्यालयांमधून अनेक प्राचार्य ,प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. या परिसंवादांमध्ये FCC संस्थेचे सचिव श्री. शैलेश मेहता , संस्थेच्या संचालिका श्रीमती. निशा मेहता,प्राचार्य डॉ. एम.डी.लॉरेन्स,MMCC चे प्राचार्य डॉ. देवीदास गोल्हार आणि श्री अमित मेहता,(श्रीमद राजचंद्र मिशन, धरमपूर),तसेच सिम्बॉयसिस संस्थेच्या प्राध्यापिका डॉ. वनश्री पाबळकर व डॉ. रुबी चंदानी उपस्थित होत्या.


            “अवयव दाना बद्दल असलेले गैरसमज दूर करून समाजामध्ये याबद्दल सर्वांगीण माहिती चा प्रसार व प्रचार करण्यासाठी या आगळ्यावेगळ्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे अशी परिसंवाद आयोजन करण्यामागील आपली भूमिका मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स (MMCC)चे प्राचार्य डॉ. देवीदास गोल्हार यांनी मांडली. 


 तसेच श्रीमद राजचंद्र मिशन, धरमपूर येथील श्री अमित मेहता यांनी अवयवदानातुन प्रत्यक्ष घडलेल्या सत्य घटनांचा संदर्भातील चित्रफित दाखवून विद्यार्थ्यांना प्रेरित केले व अवयव दान करण्याचे आवाहन केले. 


सिम्बॉयसिस संस्थेच्या प्राध्यापिका डॉ. वनीश्री पाबळकर व डॉ. रुबी चंदानी यांनी अवयवदानासंदर्भातील शास्त्रीय, कायदेशीर तसेच तांत्रिक बाबींची व ‘ऑर्गन इंडिया’ या संस्थेची माहिती देऊन सहभागी श्रोत्यांचे शंकानिरसन केले.


सदर परिसंवादाचे सूत्रसंचालन एमएमसीसी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ.अश्विनी पारखी यांनी केले. परिसंवादासाठी तांत्रिक सहाय्य एफसीसी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अर्चना म्हस्के यांनी केले. तर परिसंवादामध्ये सहभागी झालेल्या वक्त्यांचा परिचय एफसीसी महाविद्यालयाचे प्राध्यापक उमेश बेल्लूर यांनी करून दिला. तसेच एमएमसीसी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. मुक्ती बापना यांनी आभार प्रदर्शन केले.