यशस्वी' संस्थेच्यावतीने शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त सरस्वती वंदना संपन्न 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



पिंपरी :दिनांक १७ ऑक्टोबर २०२० : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटेरनशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सच्यावतीने सरस्वतीदेवीच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.


यावेळी संस्थेचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी आपल्या मनोगतात नारीशक्तीचा महिमा वर्णन करीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा संक्षिप्त आढावा सांगितला.


घर,कुटुंब व करिअर अशा सर्वच आघाड्यांवर तितक्याच समर्थपणे जबाबदारी पेलणाऱ्या असंख्य महिला या आदर्श व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण आहेत,असेही त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. 


यावेळी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर पाळून संस्थेतील मोजके अध्यापक व अन्य कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.महेश महांकाळ यांनी केले.


   फोटो ओळ:शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटऑफ मॅनेजमेंट सायन्सचे संचालक डॉ.शिवाजी मुंढे यांच्यासमवेत संस्थेचे अध्यापक व अन्य कर्मचारी.