दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय  येथे भ्रष्टाचार निर्मुलन प्रतिज्ञा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



*दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय  येथे भ्रष्टाचार निर्मुलन प्रतिज्ञा*


राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या संदेशाचे वाचन


पुणे दि.27: दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञा देण्यात आली तसेच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदेशांचे उपस्थितांसमोर वाचन करण्यात आले.


जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी  यांना प्रतिज्ञा देण्यात आली, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी प्रतिज्ञा तसेच राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या संदेशांचे वाचन केले. देशाच्या आर्थिक, सामाजिक तथा राजकीय प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा एक मोठा अडथळा असून सर्व कामे प्रामाणिकपणे करण्याची प्रतिज्ञा यावेळी उपस्थितांनी घेतली.


यावेळी अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख,निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे,उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.