जागतिक प्रतिजैविक जागरूकता सप्ताहा निमित्त २३ ते २८ नोव्हेंबर दरम्यान वेबिनार सिरीज  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे आयोजन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



जागतिक प्रतिजैविक जागरूकता सप्ताहा निमित्त २३ ते २८ नोव्हेंबर दरम्यान वेबिनार सिरीज 


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे आयोजन 


पुणे , दिनांक २० नोव्हेंबर २०२० : 


यावर्षी १८ ते २४ नोव्हेंबर दरम्यान जागतिक प्रतिजैविक जागरूकता सप्ताह साजरा केला जात आहे. प्रतिसुक्ष्म जैविकाच्या प्रतिरोधा विषयी जागतिक पातळीवर जागरूकता निर्माण करण्यासाठी हा विशेष सप्ताह जागतिक आरोग्य संघटनेतर्फे साजरा केला जातो. सर्वसामान्य जनता, आरोग्य कर्मचारी यांच्यापर्यंत प्रतिजैविकांबद्दलची योग्य माहिती प्रसारित करणारे हा यामागील मुख्य हेतू आहे. 


'प्रतिसुक्ष्म जैविक : काळजीपूर्वक हाताळा' असे २०२० सालचे घोषवाक्य असून याच अनुषंगाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे जागतिक प्रतिजैविक जागरूकता सप्ताह निमित्त २३ ते २८ नोव्हेंबर दरम्यान विशेष वेबिनार सिरीजचे आयोजन करण्यात आले आहे. 


वेबिनार सिरीज दरम्यान या विषयातील तज्ज्ञ वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये मद्रास विद्यापीठातील डॉ. थंगम मेनन, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रा.अंजु कागल, अन्न व औषध प्रशासन येथील माजी सहायक आयुक्त डॉ. आर. बी. जोशी, अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील अबसार अहमद, दिल्ली विद्यापीठातील प्रा. जे. एस. विर्दी, फूड सेफ्टी अँड स्टॅण्डर्ड ऍथॉरिटी ऑफ इंडियाचे सहसंचालक डॉ. विजय पाल सिंग, चंदीगड येथील इन्स्टिटयूट ऑफ मायक्रोबिअल टेक्नॉलॉजी मधील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अंशू भारद्वाज, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नरेंद्र कडू, मोड्युल इनोव्हेशन्स पुणे येथील डॉ. राहुल चौधरी आदी मान्यवर या वेबिनार सिरीज मध्ये मार्गदर्शन करणार आहेत. 


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक या वेबिनार सिरीज मध्ये सहभागी होऊ शकतात, अशी माहिती सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे देण्यात आली आहे.  


वेबिनार २३ ते २८ नोव्हेंबर २०२० दरम्यान दररोज सकाळी ११ ते १ या वेळेत होणार असून वेबिनार मध्ये सहभागी होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करावे :