बेपत्ता पाषाणकर जयपूरच्या एका हॉटेलात ते सापडल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्तांनी दिली

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*



 *बेपत्ता पाषाणकर जयपूरच्या एका हॉटेलात ते सापडल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्तांनी दिली*


*पुणे :-* पाषाणकर हे कृषी महाविद्यालयाजवळील मोदीबागेमध्ये राहतात.


२१ आॅ क्टोबरला दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या लोणी काळभोर येथील गॅस एजन्सीच्या ठिकाणी गेले होते. तेथून ते दुपारी चार वाजता जंगली महाराज रस्त्यावरील त्यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या कार चालकाला पानशेत येथे एका कामानिमित्त पाठविले. त्यानंतर गणेशखिंड रस्त्यावरील एलआयसी कार्यालयापर्यंत गेले. तेथून ते बेपत्ता झाले होते.


दरम्यान, कारचालकाने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे चालकाने याबाबत पाषाणकर यांचे पुत्र कपिल पाषाणकर यांना हि माहिती दिली. त्यानंतर पाषाणकर कुटुंबीयांनी त्यांचा तत्काळ शोध घेतला, मात्र ते सापडले नाहीत. त्यामुळे त्यांनी याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठून ते बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती. पाषाणकर यांचे चिरंजीव कपिल यांनी काही खळबळजनक बाबींचा दावा केला होता. पाषाणकर यांच्या अपहरणामागे राजकीय नेता असल्याचे त्यांचे म्हणणे होते. हा नेता तीन दिवस मंत्रालयात ठाण मांडून असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र त्या नेत्याचे नाव माध्यमांना सांगण्यास त्यांनी नकार दिला होता.


पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक त्यांचा शोध घेत होते. गुन्हे शाखेचे निरिक्षक ताकवले यांना पाषाणकर बाहेरच्या राज्यात असल्याची माहिती मिळाली होती. आज दुपारी तीन वाजता जयपूरच्या एका हॉटेलात ते सापडल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्तांनी दिली.