पुणे प्रवाह न्युज पोर्टल
सर्पसंकटातून ‘आर्या’ कशी वाचवेल स्वतःला ?
पुणे :- सोनी मराठी वाहिनीवरची 'आई माझी काळुबाई' सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे.त्याची विशेष चर्चा सोशल मीडियावर सातत्याने होताना दिसते. ‘आई काळुबाई’ हे साताऱ्या जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातलं लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असfलेलं देवस्थान आहे. विशेष म्हणजे या मालिकेचं चित्रीकरण साताऱ्यातच होत असल्यानं मालिकेला मातीतला अस्सलपणा आणि दृश्यश्रीमंती लाभली आहे.
मालिकेतली गोष्ट ही आर्याच्या भक्तीची आणि काळुबाईच्या शक्तीची आहे. या मालिकेत आर्याची काळुबाईवर असलेली भक्ती तिला सर्व संकटांतून मार्ग काढण्यासाठी मदत करते. आपल्या भावाला, संकेतला शोधण्यासाठी म्हणून आर्या माधवराजेंची अट मान्य करून त्यांच्या मुलाशी, अमोघशी लग्न करते. पाटील घरात आल्यापासून आर्या तिच्या भावाचा म्हणजेच संकेतचा शोध घेताना वेगवेगळ्या जीवघेण्या संकटात सापडते,त्यापैकीच एक संकट म्हणजे विषारी सापाशी तिचा सामना होतो. आर्यावर आलेले हे सर्पसंकट नेमके कसे आले आणि कोणी घडवून आणले ,त्यातून आर्या कशी मार्ग काढते, त्यात तिला आई काळुबाईचा काय संकेत मिळतो. याची उत्कंठावर्धक गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
पाहायला विसरू नका, 'आई माझी काळुबाई'. सोम.-शनि., संध्या. ७ वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.