पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला सत्तेवर येऊन १ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सरकारचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर मी पुन्हा येईन ह्यांना १ वर्षे झाले विरोधी बाकावर बसून ठेवण्यात मविआ यशस्वी झाली त्याबद्दल सुध्दा मविआ सरकारचे अभिनंदन करतो.*
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन झाल्यापासून सातत्याने महाराष्ट्रातील भाजपचे भैय्ये नेतेमंडळी सांगत होते हे विश्वासघाताने आलेले सरकार असून २ महिन्यात सरकार पडेल. आज भाजपकडे असलेले १०५ आमदार भाजप सोडून मविआ सरकार मधे जाऊन सामील होऊ नये म्हणून सातत्याने भाजपचे भैय्ये नेतेमंडळी त्या १०५ आमदारांना गाजर दाखवण्याचे काम करत आहेत. *त्यामध्ये प्रामुख्याने गंजलेल्या तोफेतले गोळे जास्त फटफट करत आहेत*
असो.......
मविआ सरकार दिवसेंदिवस भक्कम बनत चालले असून भाजप महाराष्ट्रातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागल्यामुळे भाजप महाराष्ट्रात येत्या काळात राजकीय भूकंप होणार असल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून बाहेर येत आहे. महाराष्ट्रात पुढची २० ते २५ वर्षे भाजप सत्तेवर येणार नाही याची जाणीव स्वतः "मी पुन्हा येईन चे जनक असलेल्या देवेंद्र फडणवीस" यांना असल्यामुळे ते आता केंद्रात जाऊन मंत्री होण्यासाठी तयार झाले आहेत. भाजप महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या काम करण्याच्या पध्दतीवर भाजप महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्रात मविआ सरकार सर्व सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेत असून महाराष्ट्रातील जनता मविआ सरकारच्या १ वर्षाच्या कामावर खुश असल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे.
*विशाल भोसले. कट्टर राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक.*