अतिवृष्टीमुळे घराची झालेल्या पडझडीमुळे महिला बेघर* त्वरित मदतींचे आश्वासन.. मा. राजेश देशमुख जिल्हाधिकारी पुणे* *कुणी भिंत देता का बांधून भिंत महिलेच्या आकोशाला वंचित बहुजन आघाडी, शिवाजीनगर मतदार संघ आले धावून*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



 *अतिवृष्टीमुळे घराची झालेल्या पडझडीमुळे महिला बेघर*


त्वरित मदतींचे आश्वासन.. मा. राजेश देशमुख जिल्हाधिकारी पुणे*


*कुणी भिंत देता का बांधून भिंत महिलेच्या आकोशाला वंचित बहुजन आघाडी, शिवाजीनगर मतदार संघ आले धावून*


*पुणे :-* 14/10/2020 रोजी आलेल्या मुसळधार आणि अतिवृष्टीमुळे चंद्रमणी संघ, औंध रोड येथील वास्तवाला असणाऱ्या नामे श्रीमती कांताबाई भिमराव जगताप वय वर्षे 65 या आपल्या नातु सोबत राहत आहे.


वरील तारखेला रात्री झोपेत असताना राहत्या घरची भिंत कोसळली. परंतु वेळीच जाग आल्याने मोठी जिवींत दुर्घटना टळली.


सदरील घटने नंतर औध क्षेत्रीय कार्यालय प्रशासन आणि स्थानिक नगरसेवक/नगरसेविका यांनी तोंडी आश्वासन दिले तशी काहींनी येऊन विचारपूस आणि कागदी घोडे चालविले.


परंतु सदरील महिलेस न्याय आणि कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाही. आणि सदरील महिलेवर कुणी भिंत देता का भिंत बांधून भिंत अशी आक्रोश करण्याची वेळ आली आहे.


या आक्रोशाला प्रतिसाद देत वंचित बहुजन आघाडी शिवाजी मतदार संघाचे अध्यक्ष मा. रणजित केदारी, कायदेशीर सल्लागार मा. अजय कोंरके,वंचित बहुजन आघाडीचे सदस्य संतोष ओव्हाळ,घर कोसळलेली पिडीत महिला श्रीमती कांताबाई भिमराव जगताप आणि वंचित बहुजन आघाडी शिवाजी मतदार संघाचे पत्रकार संतोष सागवेकर आदीच्या उपस्थितीत मा. राजेश देशमुख जिल्हाधिकारी पुणे यांना समक्ष भेटून, श्रीमती कांताबाई भिमराव जगताप यांच्या कुटूंबांची झालेली सर्व माहिती जिल्हाधिकारी यांना सांगितले. आणि सदरील प्रकरणी सविस्तर चर्चा केल्यानंतर, मा. जिल्हाधिकारी यांनी आश्वासन दिले की, सदरील प्रकारणाची सखोल चौकशी करून, नंतर संबंधित महिलेंस योग्य मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच मा. संजय अदिवंत उप अभियंता पुणे मनपा, औध क्षेत्रीय कार्यालय यांना वंचित बहुजन आघाडी, शिवाजीनगर मतदार संघाच्या शिष्टमंडळाने भेटून निवेदन देण्यात आले. आणि संबंधित महिंलेंची पडझड झालेली भिंत त्वरित बांधून न दिल्यास, तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे वंचित बहुजन आघाडी, शिवाजीनगर मतदार संघाच्या निवेदनात नमूद केले आहे.