पवार साहेबांबाबत चंद्रकांतदादांनी केलेलं वक्तव्य ऐकून त्या मित्राचीच आठवण झाली आणि खूप हसूही आलं”.:- आमदार रोहित पवार

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*



*चंद्रकांतदादांनी केलेलं वक्तव्य ऐकून त्या मित्राचीच आठवण झाली आणि खूप हसूही आलं:-* 


*आमदार रोहित पवार*


 


*मुंबई :-* शरद पवार हे अभ्यास नसलेले छोटे नेते असल्याची टीका पाटील यांनी केली होती. राजकारणात येण्यापूर्वी पवार मला खूप मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर ते खूप छोटे नेते असल्याचं दिसून आलं. त्यांचा अभ्यास नसतो, अशी टीका करतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मात्र अभ्यासू नेते आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. तसेच विधान परिषदेच्या जागा जिंकण्यासाठी जे करता येईल ते करा, असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं. त्यावर आता आमदार रोहित पवार यांनी पलटवार केला आहे.


सचिनकडून एखादा बॉल सुटला तर पोटावरील पॅकेटमधून एकेक पॉपकॉर्न खात घरात पाय पसरुन tv वर मॅच पाहणारा मित्र ओरडायचा…


“अर्रर्रर्र सचिनला खेळताच येत नाही…”पवार साहेबांबाबत


चंद्रकांतदादांनी केलेलं वक्तव्य ऐकून त्या मित्राचीच आठवण झाली आणि खूप हसूही आलं”. असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे.