पुणे प्रवाह न्युज पोर्टल
खासदार आणि आमदार यांच्या विकास निधीचा फायदा घेण्यासाठी शिवसेना विभागप्रमुख सरसावले
कर्जत,ता.31 गणेश पवार
पहिल्यांदा अनेक वर्षांनी कर्जत तालुक्यातील शिवसेनेला एकाच वेळी खासदार आणि आमदार मिळाले आहेत.त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या रेल्वे पट्ट्यातील सर्व गावात विकास कामे व्हावीत यासाठी तेथील शिवसेना विभागप्रमुख यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.शिवसेनेचे विभागप्रमुख असलेले शरद ठाणगे यांनी आपल्या प्रभागातील आठ ग्रामपंचायतमध्ये विकास कामे व्हावीत यासाठी यादी मावळ लोकसभ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे आणि कर्जत विधानसभा मतदारसंघ चे आमदार महेंद्र थोरवे यांना प्रत्यक्ष भेटून यादी दिली आहे.
कर्जत तालुक्यातील शिवसेनेला राज्यात पक्षाची सत्ता त्याचबरोबर लोकसभेत खासदार आणि विधानसभेत आमदार पक्षाचा अशी तिहेरी संधी विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्राप्त झाली आहे.त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची मोठी संधी कर्जत तालुक्यातील शिवसनेच्या कार्यकर्त्याना चालून आली आहे. त्यामुळे आपल्या विभागातील कामे करून घेण्यासाठी जिल्हा परिषद गटातील विभागप्रमुख आणि पंचायत समिती गणाचे विभागप्रमुख यांनी गावागावात पोहचवून कोणती महत्वाची विकास कामे करणे आवश्यक आहे,यासाठी जनसंपर्क वाढवला आहे.तालुक्यातील उमरोली जिल्हा परिषद गट हा पक्षाचा बालेकिल्ल्य समजला जातो.या बालेकिल्ल्यात विकास कामे खासदार आणि आमदार यांच्या माध्यमातून व्हावीत यासाठी शिवसेनेचे विभागप्रमुख शरद ठाणगे यांनी कंबर कसली आहे.उमरोली या कर्जत तालुक्यातील रेल्वेपट्ट्यातील भागात शिवसेनेला कायम येथील मतदारांनी साथ दिली आहे.त्यामुळे या भागात खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या विकास निधी मधून मोठ्या प्रमाणात विकास कामे व्हावीत अशी अपेक्षा ठाणगे यांना आहे.त्यानुसार ठाणगे यांनी आपल्या विभागातील किरवली,उमरोली, उकरूळ,चिंचवली तसेच आसल, दहिवली,माणगाव आणि कोल्हारे ग्रामपंचायत मधील प्रलंबित विकास कामे यांची यादी तयार करून विकास कामे दोन भागात विभागून घेतली.
उमरोली जिल्हा परिषद गटातील प्रलंबित विकास कामे यांची माहिती शाखाप्रमुख स्तरावर घेतल्यानंतर विभागप्रमुख शरद ठाणगे यांनी खासदार श्रीरंग बारणे यांची पुणे येथील कार्यालयात भेट घेऊन उमरोली जिल्हा परिषद गटातील विकास कामांची यादी सादर केली.ठाणगे यांनी पंचायत समिती गणाचे विभागप्रमुख अविनाश भासे यांच्यासह खासदार बारणे यांनी ती यादी सादर केली.त्याचवेळी कर्जत विधानसभा मतदारसंघाचे खासदार महेंद्र थोरवे यांची त्यांच्या पोसरी येथील कार्यालयात भेट घेऊन विकास कामांची यादी सादर केली.पक्षाचे तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे यांच्या उपस्थितीत आमदार थोरवे यांना प्रलंबित विकास कामांची यादी सादर केली.खासदार आणि आमदार यांनी आठ ग्रामपंचायत मधील प्रत्येक गावात आणि आदिवासी वाड्यांमध्ये किमान एक काम मंजूर करावे अशी मागणी उमरोली जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे विभागप्रमुख शरद ठाणगे यांनी केली आहे.
फोटो ओळ : गणेश पवार
मागणी पत्र सादर करताना शरद ठाणगे