संग्राम शेवाळे पुणे पदवीधर मतदारसंघ पिंजून काढणार

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



**संग्राम शेवाळे पुणे पदवीधर मतदारसंघ पिंजून काढणार**


पुणे:-संग्राम शेवाळे जनता दल (से) विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आज पर्यंत विद्यार्थी हितासाठी प्रामाणिक काम करत आले आहेत. आता राज्यात पदवीदरची निवडणूक लागली आहे.काही पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले तर काही पार्टीचे उमेदवार जाहीर झाले नाहीत.संग्राम शेवाळे हे आता विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून पक्षाच्या उमेदवार निवडून आणण्यासाठी मैदानात उतरले आहेत.गेली दोन महिने त्यांनी आपल्या संघटनेच्या आणि टीमच्या माध्यमातून पदवीदर मतदारसंघात अंतर्गत काम चालू केले होते.विरोधी पक्षातील उमेदवारांनी संग्राम शेवाळे यांची प्रत्यक्ष काहींनी फोन द्वारे मदतीसाठी चर्चा केली आहे.जनता दल (से) पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष मा.नाथाभाऊ शेवाळे यांनी काल या देशाचे माजी पंतप्रधान आणि खा.मा.एच.डी.देवेगौडा (साहेब) यांची बंगलोर इथे निवासस्थानी भेट घेऊन यावर सविस्तर चर्चा केली आहे.लवकरच जनता दल (से) भूमिका आणि उमेदवार स्पष्ट होणार आहे.संग्राम शेवाळे लवकरच पश्चिम महाराष्ट्र दौरा करणार आहेत त्यांचे मित्र आणि सहकारी या भागात मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे पक्षाला संग्राम शेवाळे आणि विद्यार्थी संघटनेचा खूप मदत होणार आहे.या मतदारसंघात जनता दलाचा उमेदवार मा.आ. शरद पाटील मागे प्रकाश जावडेकर यांनी पराभूत करून निवडून आले होते त्यामुळे या मतदारसंघात जनता दलाचा चांगला दबदबा आहे.असे आमच्या माध्यमांशी बोलताना संग्राम शेवाळे यांचे सचिव प्रदेश कार्यलय मुंबई यांनी सांगितले.