पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*देशाचे प्रधानमंत्री जरी वेगळ्या विचाराचे असतील तरीदेखील त्यांना आपलं पुणे हवहवस वाटतंय.....
खासदार सुप्रियाताई सुळे*
पुणे : देशाचे प्रधानमंत्री शनिवारी २८ नोव्हेंबर रोजी पुण्याला येत आहेत. कदाचित ते आपले कौतुक करायला येणार असतील, मी त्यांच्या दौऱ्याचा चांगला अर्थ काढते असे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. आपल्या सरकारला एक वर्ष होणार आणि देशाचे प्रधानमंत्री आपल्या जिल्ह्यातल्या ठिकाणी काम होतंय हे बघण्यासाठी येणार याच्यापेक्षा काय मोठे यश आपल्या सरकारचे असेल ? असेही त्या पुढे म्हणाल्या.
देशाचे प्रधानमंत्री जरी वेगळ्या विचाराचे असतील तरीदेखील त्यांना आपलं पुणे हवहवस वाटतंय असा टोला देखील आपल्या भाषणात खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे .