टाटा इंटरनॅशनल डीएलटी कंपनीच्या वतीने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन्स जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्याकडे सुपूर्द

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 

टाटा इंटरनॅशनल डीएलटी कंपनीच्या वतीने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन्स जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्याकडे सुपूर्द

पुणे,दि.4: टाटा इंटरनॅशनल डीएलटी प्रायव्हेट लिमिटेड, वाकी, (ता. खेड) कंपनीच्या वतीने सामाजिक दायित्व बांधिलकी (सीएसआर) अंतर्गत कोविड-19 रुग्णांच्या उपचाराकरिता 25 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन्स जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे तसेच कंपनीचे प्रतिनिधी राजीव बात्रा व भिमसिंग राजपूत आदी उपस्थित होते.

00000