पुणे प्रवाह न्युज पोर्टल
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्यात सामंजस्य करार
पोलीस अधिकारी/ कर्मचारी तसेच इच्छुक नागरिकांना रेखाचित्र रेखाटनाचे प्रशिक्षण दिले जाणार
पुणे, दिनांक ३ नोव्हेंबर २०२० :
सोमवार दिनांक २ नोव्हेंबर २०२० रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. रेखाचित्र रेखाटन याबाबत समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे, इच्छुक पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांना प्रशिक्षण देणे, प्रशिक्षण पूर्ण करणारे प्रशिक्षणार्थी यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे विद्यमाने प्रमाणपत्र अदा करणे याविषयी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ.) नितीन करमळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य अतुलचंद्र कुलकर्णी, पोलीस अधीक्षक संभाजी कदम , विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण साळुंके, विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, पोलीस उप-अधीक्षक अनुजा देशमाने, पोलीस निरीक्षक अमोल गवळी, प्रा. डॉ. गिरीष चरवड, चित्रकार समीर धर्माधिकारी, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुरेश गोसावी, तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर, इंटरडिसिप्लिनरी स्कूल ऑफ सायन्सचे प्रमुख डॉ. अविनाश कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
रेखाचित्र कक्षातून पोलीस अधिकारी/ कर्मचारी तसेच इच्छुक नागरिकांना ५/१५/३० दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या विषयातील भारतातील प्रथम डॉक्टरेट प्राप्त प्राध्यापक डॉ. गिरीष अनंत चरवड हे प्रशिक्षण देणार आहेत.