सुप्रसिद्ध व समाजशील कवियत्री मा. अर्चना दिलीप सुतार.(पाचवड) सातारा यांनाUNITED NATIONS 75th ANNIVERSARY HISTORICAL MEMORIAS AWARDS 2020" आंतरराष्ट्रीय पुरस्कार बहाल!

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



मलेशिया देशाकडून सुप्रसिद्ध व समाजशील कवियत्री मा. अर्चना दिलीप सुतार.(पाचवड) सातारा यांना(UN) म्हणजेच संयुक्त राष्ट्र संघांच्या वतीने 75व्या वर्धापन दिनानिमित्त"UNITED NATIONS 75th ANNIVERSARY HISTORICAL MEMORIAS AWARDS 2020" आंतरराष्ट्रीय पुरस्कार बहाल!


 अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराच्या व सन्मान पत्राच्या मानकरी ठरल्या अर्चना सुतार


 सातारा: पाचवड(ता.वाई) महाराष्ट्र, भारत येथील माननीय सुप्रसिद्ध कवियत्री अर्चना दिलीप सुतार यांनी आजवर त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये भक्कम ठसा उमटवलेला आहे. त्या शिक्षक, प्रसिद्ध कवयित्री आणि समाजसेविका, सुधारीका आहेत. कोरोनाच्या काळात कोरोना चालू झालेपासून समाजासाठी जीव तुटणाऱ्या त्यांच्या मनाची कोरोना पासून बचावासाठी काय केले पाहिजे यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आणि करत आहेत. अनेक कविता प्रसारमाध्यमांद्वारे कवितांतून भारतभर जागृतीचे कार्य केले. समाजासाठी त्यांचे आयुष्य त्यांनी वाहून घेतले. कवितांतून प्रबोधन करत महाराष्ट्रापुरत्या मर्यादित न राहता भारतभर आणि भारताच्या बाहेरही परदेशात त्यांचे कार्य धडकले. त्याचे श्रेय म्हणूनच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याने भारतातील प्रत्येक राज्याने सन्मानपत्र, मेडल तर कोणी पुरस्कार देऊन गौरवले असतानाच परदेशातूनही श्रीलंका देशाने दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले.


               आता तर नवलच 24 ऑक्टोंबर 2020 रोजी जगातील अमेरिका,इंग्लंड, रशिया,नॉर्वे,म्यानमार, ऑस्ट्रेलिया,पेरू,घाणा,इजिप्त, ब्राझील,कॅलिफोर्निया, मुख्यालय असलेले न्यूयॉर्क इत्यादी 193 देशांचे संयुक्त संस्थानचा 75 वर्धापन दिन साजरा झाला. या 75व्या (UN) संयुक्त संस्थांच्या वर्धापन दिनानिमित्त संयुक्त संस्थांनाच्या वतीने (मलेशिया)या देशाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन "UNITED NATIONS 75th ANNIVERSARY HISTORICAL MEMORIAS AWARD 2020" हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांना गौरवले. त्यांना हा पुरस्कार देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय विधि,आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, मानव अधिकार, विश्वशांती प्राप्त करणे, यावरून सुरक्षा, जागतिक महामारी सध्याची कोविंड परिस्थिती तसेच व्यसनमुक्ती अशामध्ये कार्याचा ठसा उमटवणाऱ्याना दिला जातो. त्यांच्या या कार्याची राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठ्या प्रमाणात राष्ट्रांच्या वतीने जय जयकार होत आहे. हा पुरस्कार मिळाल्याचे कळताच महाराष्ट्र, भारत आणि परदेशातही सुप्रसिद्ध कवियित्री मा.अर्चना दिलीप सुतार यांच्यावर सर्व स्तरातील लोकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.