*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
, ' मी खुप कमी वयात अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. या गोष्टीचा परिणाम माझ्या अभ्यासावर होत होता.
सोडण्या मागचे कारण
मुंबई :- एवढ्या वर्षांनी झील मेहताने सांगितले 'तारक मेहता का उल्टा चश्मा' सोडण्या मागचे कारण
काही मालिका टेलिव्हिजनवर खुप प्रसिद्ध आहेत. यातलीच एक मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका २००८ मध्ये सुरू झाली होती. त्यावेळी या मालिकेत लहान सोनूची भुमिका अभिनेत्री झील मेहताने निभावली होती. प्रेक्षकांना या भुमिकेला खुप जास्त प्रेम दिले होते. खुपच कमी वेळात झीलला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली होती.
झील म्हणाली की, 'मी खुप कमी वयात अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. या गोष्टीचा परिणाम माझ्या अभ्यासावर होत होता. म्हणून मी दहावीची तयारी करण्यासाठी आणि पुढचे शिक्षण घेण्यासाठी ही मालिका सोडली होती. त्यानंतर मी माझ्या अभ्यासावर लक्ष दिले'.
मालिकेतील भुमिके प्रमाणेच झील खऱ्या आयुष्यात देखील अभ्यासात अतिशय हुशार होती. तिला दहावीला ९३% टक्के मिळाले होते. अभिनय क्षेत्रापासून लांब गेल्यानंतर झीलने तिचे शिक्षण पूर्ण केले. आज ती चांगल्या ठिकाणी नोकरी करत आहे.झील मेहता सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. ती आत्ता खुपच सुंदर दिसते. झीलच्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर तिचे अनेक ग्लॅमरस फोटो आहेत. जे नेहमीच व्हायरल होत असतात. तिला चांगली संधी मिळाली तर ती परत अभिनय क्षेत्रात प्रवेश करू शकते.