पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे :- कॉमेडी बिमेडी’च्या पहिल्या भागाची खास झलक
विनोदवीरांच्या धमाकेदार परफॉर्मन्सेसनी होणार हास्याची आतषबाजी
दिवाळीच्या शुभमुहुर्तावर म्हणजेच १५ नोव्हेंबरपासून स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या ‘कॉमेडी बिमेडी’ या नव्या कार्यक्रमाची सध्या कमालीची उत्सुकता आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिवाळीला विनोदाची खमंग मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. आशिष पवार, दिगंबर नाईक, अतुल तोडणकर, मंगेश देसाई, किशोरी अंबिये, आरती सोळंकी, संतोष पवार, कमलाकर सातपुते, अंशुमन विचारे, परी तेलंग, प्राजक्ता हनमघर, शेखर फडके, बालाजी सुळ, देवयानी मोरे, शर्वरी लहादे आणि पूर्णिमा अहिरे हे १६ विनोदवीर आपल्या अनोख्या अंदाजाने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. याच कार्यक्रमाच्या पहिल्या भागामधले हे काही निवडक क्षण आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागासाठी निर्मिती सावंत, आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री, सुप्रिया पाठारे, विकास समुद्रे, विजय पटवर्धन, अतुल आणि सोनिया परचुरे हे खास गेस्ट असणार आहेत. तर पहिल्या भागाचं सूत्रसंचालन करणार आहेत मकरंद अनासपुरे आणि कविता लाड-मेढेकर.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात निखळ हास्याचे क्षण कुठेतरी हरवत चालले आहेत. ‘कॉमेडी बिमेडी’ कार्यक्रमाद्वारे हेच हरवलेले मजेशीर क्षण पुन्हा वेचण्याचा प्रयत्न असेल. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे कोणत्याही स्वरुपाची स्पर्धा नसेल त्यामुळे शोमध्ये परीक्षण नाही आणि परीक्षण नसल्यामुळे इथे परीक्षकही नाहीत. विनोदवीरांच्या जोड्या धमाल विनोदी स्कीटचं सादरीकरण करतील. त्यामुळे १ तास प्रेक्षकांचं फक्त आणि फक्त मनोरंजन होणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला सूत्रसंचालकही नसेल. त्यामुळे विनोदवीरच थेट प्रेक्षकांशी संवाद साधतील. तेव्हा पाहायला विसरु नका नवा कार्यक्रम ‘कॉमेडी बिमेडी’ १५ नोव्हेंबरपासून रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.