पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*
पुणे :- कलाश्री पुणे संस्थेचे संस्थापक व लोककला महाराष्ट्राची या कार्यक्रमाची निर्माता सह सर्वेसर्वा धुरा हभप चारूदत्त आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोककला क्षेत्राशी प्रामाणिक राहून सांभाळणारे सर्व पारंगत हरहुन्नरी तसेच सिने-नाट्य याही माध्यमातून कार्यरत असलेले ज्येष्ठ लोककलावंत शाहीर प्रवीणराजे सूर्यवंशी यांचे ह्दय विकाराने दुःखद निधन झालै.मूत्यूसमयी त्यांचे ५१ वय होते.त्यांच्या पाठीमागे आई,वडील,पत्नी,दोन मुले,बहीण व बंधू बारा बलुतेदार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी असा परीवार आहे.
काका किशाचा या नाटकात महाविद्यालयीन जीवनात रंगकर्मी विक्रम गायकवाड यांनी मेकअप केलेल्या व नंतर त्यांच्या गाजलेल्या स्री पात्राची भूमिका करीत कला क्षेत्रातील प्रवास सुरु केला होता.नंतर लोककला क्षेत्रात काम करायचे ठरवून लोककला महाराष्ट्राची कार्यक्रमाची निर्मिती करीत पुढील ३०वर्षात एकूण २६८२ कार्यक्रम केले.यासोबतच विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम राबवले.तसेच एकूण चार सिनेमा,कल्याणी,सोनियाचा उंबरा यां मालिका यासह अनेक छोट्या भूमिका त्यांनी केलेल्या होत्या.फुलोरा सप्तसुरांचा हाही मराठी गीतांचा कार्यक्रमाचे निर्माते होते.अनेक नवकलावंताना संधी देत त्यांचे करिअर घडवण्यामध्ये त्यांचे योगदान होते.सिने अभिनेते प्रसाद ओक,विजय कदम,सतिश तारे,सिध्देश्वर झाडबुके,चंद्रशेखर महामुनी,शा.हेमत मावळे आदी अनेक कलावंत या त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होते.महानायक अमिताभ बच्चन,शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे,ज्येष्ठ लोककलावंत शा.साबळे व विठ्ठल उमप यांनी कार्यक्रमास हजेरी लावत त्यांना लोककला क्षेत्रात देत असलेल्या योगदानाबद्दल पाठीवर थाप देत त्यांना आर्शीवाद दिले होते.
या कार्याची दखल घेत त्यांना खा. शरदचंद्र पवार यांच्या हस्ते बहुजन पुरस्कार,शा.सगनभाऊ पवार,स्व बापूसाहेब जिंतीकर,गदिमा पुरस्कार,पुणे व पि.चि.मनपा व बारा बलुतेदार विकास संघातर्फे जीवनगोरव यासह २१० विविध नामवंत संस्थातर्फे त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलै होते.
कलाश्री पुणे व बारा बलुतेदार समाज विकास संघ,पुणे आणि शा.प्रवीणराजे सूर्यवंशी मित्र परिवाराच्यावतीने येत्या शनिवारी ७ नोव्हेंबर रोजी दु.४ वा. बलुतेदार संघाच्या कार्यालयात कसबा पेठ,पुणे येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वरील संस्थांच्यावतीने करण्यात आलेले आहे