वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा घेतलेला निर्णयाचे भारतीय धर्मनिरपेक्ष पक्षाच्या वतीने जाहीर स्वागत... 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



महारवाडा, बौद्धवाडा, मांगवाडा, ढोरवस्ती, ब्राम्हणवाडा, अशा स्वरुपाची वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा घेतलेला निर्णयाचे भारतीय धर्मनिरपेक्ष पक्षाच्या वतीने जाहीर स्वागत... 


मुंबई : राज्यातील शहरे आणि ग्रामीण भागातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.


काही वस्त्यांची नावे महारवाडा, बौद्धवाडा, मांगवाडा, ढोरवस्ती, ब्राम्हणवाडा, माळी गल्ली, अशा स्वरुपाची नावे आहेत.  ही बाब महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला भुषणावह नसल्याने सामाजिक सलोखा आणि सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वाढण्याच्या दृष्टीने ही नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.  या वस्त्यांना आता समता नगर, भीम नगर, ज्योती नगर, शाहू नगर, क्रांती नगर तसेच इतर तत्सम नावे देण्यात येतील. 


यापूर्वी दलित वस्ती सुधार योजनेच्या नावात बदल करुन त्याऐवजी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे असे करण्यात आलेले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार हे नाव बदलून डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार असे करण्यात आलेले आहे.


राष्ट्रपतींच्या आदेशानुसार अनुसूचित जातींच्या संबोधनाकरिता, सर्व सरकारी व्यवहार, प्रकरणे, प्रमाणपत्र इत्यादींमध्ये “दलित” शब्दाऐवजी इंग्रजी भाषेत “Scheduled Caste & Nav Bouddha” आणि मराठी भाषेत “अनुसूचित जाती व नव बौध्द” या संबोधनाचा वापर करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.


राष्ट्रपतींच्या आदेशानुसार अनुसूचित जातीं धर्माच्या  वस्त्याचे नाव बदलण्याचा घेतलेल्या इतिहासिक निर्णयाचे स्वागत कामगार नेते आणि महाप्रदेशाध्क्ष संतोष सागवेकर भारतीय धर्मनिरपेक्ष पक्ष कामगार युनियनच्या वतीने जाहीर स्वागत करण्यात येत आहे.