एक सामान्य रा. काॅ कार्यकर्ते यांचे रोखठोक उत्तर चंपा जी नरेंद्र मोदी जी यांची छाती खरंच ५६" असेल तर त्यांनी आज संपूर्ण देशात बॕलेट पेपर वर निवडणूका जाहीर कराव्यात... विशाल भोसले. कट्टर राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



चंपा जी नरेंद्र मोदी जी यांची छाती खरंच ५६" असेल तर त्यांनी आज संपूर्ण देशात बॕलेट पेपर वर निवडणूका जाहीर कराव्यातविशाल भोसले. कट्टर राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक


पुणे :- भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंपा यांनी काल एक वक्तव्य केले की हिंमत असेल तर एकटे-एकटे लढा. चंपा जी नरेंद्र मोदी जी यांची छाती खरंच ५६" असेल तर त्यांनी आज संपूर्ण देशात बॕलेट पेपर वर निवडणूका जाहीर कराव्यात मग बघू देशात कोणाची किती ताकद आहे. 


चंपा जी महाराष्ट्रात मविआ सरकार मधील पक्षाना एकटे लढण्याचे फुकटचे सल्ले तुम्ही देताय तर गेल्या महिन्यात बिहार विधानसभा निवडणूकीत समोर तेजस्वी यादव हा एकटाच ३० वर्षाचा युवक उभा असताना भाजपने नीतीश कुमार यांच्या पक्षासोबत युती कशासाठी केली होती. बिहार निवडणूकीत भाजपचा पराभव हा जनतेने केलेला असून मतदान करण्यासाठी ई व्ही एम मशीन न वापरता बॕलेट पेपर वापरले असते तर आज भाजपला देशात तोंड लपवायला सुध्दा जागा मिळाली नसती.


गेल्या १ वर्षापासून सातत्याने महाराष्ट्रातील भाजपचे भैय्ये नेतेमंडळी सांगत होते मविआ मधील तीन पक्षात समन्वय नाही पण काल विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निकालातून भाजपला मविआ सरकारने स्पष्ट उत्तर दिले आहे की मविआ भक्कम असून भाजप मधील अंतर्गत वाद मात्र ह्या निवडणूकीच्या निमित्ताने (मी पुन्हा येईन) पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेले महाराष्ट्रातील जनतेला दिसून येत आहे.


*विशाल भोसले. कट्टर राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक.*