पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*ग्लॅमरस ता-यांचे फेवरेट ‘फेमिना फ्लाँट स्टुडिओ सलून’ पुण्यात झाले लाँच*
मुंबईत दोन फेमिना फ्लाँट स्टुडिओ सलून लाँच झाल्यावर बेनेट कोलमन आणि कंपनी लिमिटेड, (टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप)ने आपल्या पहिल्या फेमिना फ्लाँट स्टुडिओचे आउटलेट पुण्यात लाँच केले आहे. टाइम्स लाइफस्टाईल एंटरप्राइझचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप दहिया यांच्यासह फेमिना फ्लाँट स्टुडिओच्या उद्घाटन सोहळ्यात आर्विती चौधरी आणि नेहा जयस्वाल ह्या लिवा मिस दिवा सुप्रानॅशनलच्या दोन्ही फायनलिस्टही उपस्थित होत्या. फेमिना फ्लाँट स्टुडिओ सलूनची ही पुण्यातली पहिली फ्रँचायझी आहे. जी केस, मेकअप, नखे आणि त्वचेविषयक सौंदर्य सेवा देताना जागतिक पातळीवरील चालू ट्रेंडनूसार सेवा प्रदान करते.
लाँचिंगविषयी बोलताना टाईम्स लाइफस्टाईल एंटरप्राइझचे सीईओ संदीप दहिया म्हणाले, “. फेमिना फ्लाँट स्टुडिओ सलूनची पुण्यात फ्रँचायझी सुरू करताना आम्हांला आनंद होतोय. पुणे शहराला स्वत:चे सुंदर व्यक्तिमत्व आहेच. आता ह्या सौंदर्याला आम्ही ग्लॅमरची झालर देण्याचा प्रयत्न करत आहोत.”
ते पुढे म्हणतात, " पुढील 3 वर्षांमध्ये, आम्ही फेमिना फ्लाँट स्टुडिओ सलून देशातील आणखी 100 नवीन ठिकाणी विस्तारित करण्याची योजना आखत आहोत. सौंदर्यविषयक जागतिक स्तरावर प्रचलित असलेल्या सेवा लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. "
लीवा मिस दिवा सुप्रानॅशनल 2020ची विजेती आर्विती चौधरी ह्यावेळी म्हणाली, “मला इथले डिझाइन, दिलासादायक अनुभव आणि सकारात्मक वातावरण खूप आवडले. सौंदर्यविषयक जागतिक स्तरावर प्रचलित असलेल्या सेवा देण्यासाठी फेमिना फ्लाँट सलून प्रचलित आहे.”
फेमिना फ्लाँट स्टुडिओ सलूनमध्ये, नवे प्रयोग आणि कौशल्य ह्याची योग्य सांगड घातली जाते. सौंदर्याचा समग्रतेने विचार करताना फिटनेस आणि पोषण आहाराचा ही समावेश होतो. म्हणूनच या क्षेत्रातही फेमिना फ्लाँट स्टुडिओ सलून, डॉ. मिकी मेहता आणि सांची एस. नायक ह्या तज्ञांसोबत काम करत आहे. ह्यासह, नम्रता नाईक (त्वचा आणि नेल केअरची तज्ञ) आणि तनवीर शेख (केसांची निगा राखण्याचे तज्ञ)सह नामांकित सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट नम्रता सोनीबरोबरही फेमिना फ्लाँट स्टुडिओ सलून काम करतात.
लॉन्चिंगबद्दल बोलताना लीवा मिस दिवा सुप्रानॅशनल 2020ची उपविजेती नेहा जयस्वाल म्हणाली, “आपण सलूनमध्ये गेल्यावर एक-दोन तास तरी सहज घालवतो. आणि मी अशापध्दतीचा मन ताजेतवाने करणारा सलून एक्सपिरीअन्स दूसरीकडे कुठेही घेतलेला नाही आहे. “
फेमिना फ्लाँट स्टुडिओ सलूनच्या फ्रँचायझी पार्टनर शोभा कुलकर्णी म्हणाल्या, “’टाइम्स ग्रुपच्यासोबत फेमिना फ्लाँट सलूनची पुण्यात सुरूवात करताना आम्ही खूप उत्साही आहोत. ह्या सलूनचे डिझाइन असो की, ह्यातल्या सौंदर्य सेवा प्रत्येक बाबतीत बारकाईने विचार करण्यात आलाय. एका खास संकल्पनेवर ह्या सलूनची निर्मिती झालीय. आम्हांला पूर्ण विश्वास आहे की, पुणेकरांना हा आल्हाददायक अनुभव नक्कीच आवडेल.”