पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पिंपरी - चिंचवड :- शनिवार दिनांक १२ डिसेंबर २०२० रोजी मा. केंद्रीय कृषिमंत्री लोकनेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा ८० वा वाढदिवस साजरा होणार आहे. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने साहेबांचा अभिष्टचिंतन सोहळा व त्यानिमित्त कोविड योद्धा सन्मान, तृतीयपंथी यांचा सन्मान, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर, वृक्षारोपण, क्रिकेट स्पर्धा तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम रामकृष्ण मोरे नाट्यगृह चिंचवड या ठिकाणी सकाळी १०:३० वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. अशी माहिती शहराध्यक्ष श्री. संजोग वाघेरे (पाटील) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील ३६ जिल्हे ३५० तालुके व ०७ शासकीय विभाग या अंतर्गत त्या त्या भागातील सर्व कार्यकर्त्यांना सर्वसामान्य नागरिकांना एकाच ठिकाणी बसून सदरचा मुंबई येथील साहेबांचा अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम ऑनलाईन स्क्रीनच्या माध्यमातून सर्वांना पाहता येईल. मुंबई येथील हा आगळावेगळा अभिष्टचिंतन कार्यक्रम अगदी मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असून, साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी कोणत्याही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मुंबईला न येण्याचे अवाहन या निमित्ताने करण्यात येत आहे. सध्या कोरोणाचे महा भयंकर संकट पाहता सर्वांनी सोशल डिस्टंन्स, मास्क, सॅनिटायझर आदी बाबींची दक्षता घेऊन कार्यक्रम संपन्न होणार आहे.
सदरची बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिध्द करावी, ही विनंती.