पुणे प्रवाह न्युज पोर्टल
नेरळ पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी यांना अटक
कर्जत,ता.10 गणेश पवार
नेरळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करू नये म्हणून आरोपी यांच्याकडून 40 हजाराची लाच मागितल्याप्रकरणी महिला पोलीस कर्मचारी यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.या गुन्ह्यातील आरोपी यांना अटक करू नये यासाठी 40 हजाराची रक्कम मागितली होती आणि संबंधित लाच प्रकरण ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल होते.या प्रकरणात आज महिला पोलीस शिपाई यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा सप्टेंबर 2020 मध्ये झाला होता.त्यानंतर या हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक मारहाण केल्याच्या गुन्ह्याप्रकरणी नेरळ पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.मात्र या गुन्ह्यातील आरोपी यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविला होता.नेरळ पोलीस ठाणे मधील दाखल गुन्हा 5/2020 मध्ये संबंधित आरोपी यांच्यावर भारतीय दंड संहिता 498(अ) तसेच 323,504,506,34 आणि मुस्लिम महिला अधिनियम 2019चे कलम 3 आणि 4 अन्वये दाखल गुन्ह्याचा तपास 32 वर्षीय महिला पोलीस नाईक या करीत होत्या.
गुन्ह्याचा तपास करीत असलेल्या महिला पोलीस शिपाई यांनी आरोपी यांना अटकपूर्व जामीन घेण्यासाठी मदत करण्याकरिता आणि अटक न करण्यासाठी तपासी महिला पोलीस शिपाई यांनी 40 हजाराची लाच मागितली अशी तक्रार मुंबई येथील हुंड्याबाबत दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी यांनी ठाणे येथील लाचलुचपत विभागाकडे केली होती.संबंधित प्रकरणी अटकपूर्व जामीन घेणाऱ्या आरोपी यांनी ठाणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर लाच प्रकरणी तपास करणारे लाचलुचपत विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश चोपडे, पोलीस विचारे,सोडकर,महिला पोलीस नाईक गणपते,राजपूत यांनी महिला पोलीस यांना अटक केली.