सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने बंगळुरू येथे डॉ. के. सिवन यां सुर्यदत्ता ना 'सूर्यभूषण आंतराष्ट्रीय पुरस्कार' प्रदान

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल


सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने बंगळुरू येथे

डॉ. के. सिवन यां सुर्यदत्ता ना 'सूर्यभूषण आंतराष्ट्रीय पुरस्कार' प्रदान 

पुणे : भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. के. सिवन यांना सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने 'सूर्यभूषण आंतरराष्ट्रीय पुरस्कार' प्रदान करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्या अध्यक्षतेखालील 'सूर्यदत्ता'च्या शिष्ट मंडळाने नुकतीच 'इस्रो'च्या बेंगळुरू येथील मुख्यालयाला भेट दिली. त्यावेळी प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्या हस्ते डॉ. के. सिवन यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 'सूर्यदत्ता'चे कार्यकारी विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया आणि संचालक प्रा. सुनील धाडीवाल उपस्थित होते. डॉ. के. सिवन यांनी 'इस्रो'मधील अनेक आठवणी सांगितल्या. त्या ऐकताना 'सूर्यदत्ता'चे शिष्ट मंडळ भारावून गेले. यावेळी सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्चच्या (एसआयएसआर) उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. के. सिवन यांना निमंत्रण देण्यात आले. ते त्यांनी आदरपूर्वक स्वीकारले. 

प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, "जागतिक प्रतिष्ठेचे अंतराळ संशोधन केंद्र असलेल्या 'इस्रो'ला भेट देण्याची संधी मिळाल्याचा मोठा आनंद आहे. आम्हा सर्व सूर्यदत्ता परिवारासाठी ही अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. डॉ. के. सिवन यांची भेट घेऊन त्यांना सन्मानित केल्याने 'सूर्यदत्ता'ही सन्मान झाला आहे. या भेटीदरम्यान डॉ. के. सिवन यांचे मौल्यवान मार्गदर्शन प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व दर्जेदार शिक्षण देण्याची सूर्यदत्ताची परंपरा आहे. शालेय मुलांसाठी विज्ञान विषयात रस निर्माण करण्याच्या दृष्टीने आम्ही अनेक उपक्रम राबवत असतो." विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण विचार व संशोधन क्षमतेला प्रोत्साहन दिले जाते. समाजात घडणाऱ्या वैज्ञानिक घडामोडी जागृत करण्यासाठी निरनिराळे उपक्रम राबविण्यात येतात. संस्थेतील विद्यार्थ्यांसोबतच महाराष्ट्रातील इतर शाळांतील विद्यार्थी यामध्ये सहभागी होतात. सूर्यदत्ता संस्थेच्या बावधन कॅम्पसमध्ये राज्यस्तरीय विज्ञान प्रकल्प, वैज्ञानिक प्रदर्शने आदी स्पर्धा आयोजिल्या जातात,असेही डॉ. चोरडिया यांनी नमूद केले.

याप्रसंगी प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी डॉ. के.सिवन यांना सूर्यदत्ता संस्थेला भेट देण्याचे, तसेच विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, प्राध्यापकांना वैज्ञानिक संशोधनासाठी मार्गदर्शन करण्याचे आमंत्रण दिले. संशोधन क्षेत्रातील उदयोन्मुख संशोधकांना प्रोत्साहित करण्यासाठी डॉ. के. सिवन मार्गदर्शन करणार आहेत.

---------------------------------------------

इस्रोची भेट संस्मरणीय : डॉ. चोरडिया

भेटीदरम्यान सूर्यदत्ता प्रतिनिधींना इस्रो हेरिटेज सेंटर अँड म्युझियम दाखविण्यात आले. छोट्याशा शेडपासून इस्रोची सुरुवात आणि नंतरच्या काळात इतिहास घडवणाऱ्या घडामोडी समजून घेतल्या. डॉ. विक्रम साराभाई, प्रा. सतीश धवन, डॉ. कृष्णास्वामी कस्तुरीरंगन, डॉ. ए. किरण कुमार आदींनी इस्रोला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून दिली. येथील संग्रहालयात इस्रोच्या दिग्गज नेत्यांची माहितीही देण्यात आली. तसेच येथील कामकाजाची माहिती सांगितली यामध्ये प्रसारण, संप्रेषण, हवामान अंदाज, आपत्ती व्यवस्थापन साधने, भौगोलिक माहिती प्रणाली, व्यंगचित्र, नेव्हिगेशन, टेलिमेडिसीन, विशिष्ट उपग्रह उत्पादने आणि साधने विकसित करण्याचे संग्रहालय देखील दाखविण्यात आली. ही भेट सर्वार्थाने संस्मरणीय झाल्याचे डॉ. चोरडिया म्हणाले.