एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे ऑनलाईन चार दिवसीय ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’ डॉ. के. कस्तुरीरंगन, डॉ. जगदीश गांधी व डॉ. अच्युत समंता यांना ‘जीवन गौरव पुरस्कार

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल


एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे

ऑनलाईन चार दिवसीय ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’

डॉ. के. कस्तुरीरंगन, डॉ. जगदीश गांधी व डॉ. अच्युत समंता यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’

पुणे, ता.१० डिसेंबर: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे तर्फे दि. १५ ते १८ डिसेंबर २०२० या कालावधीत चौथ्या ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’ (एनटीसी) या चार दिवसीय ऑनलाईन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) २०२० ः उपलब्ध संधी’ हा परिषदेचा मुख्य विषय आहे.

या परिषदेचे उद्घाटन मंगळवार, दि. १५ डिसेंबर रोजी सकाळी ११.०० वा. होणार आहे. या समारंभासाठी मणिपूरच्या राज्यपाल डॉ. नजमा हेपतुल्ला या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. माजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री पद्मविभूषण डॉ. मुरली मनोहर जोशी, कन्साई जपान इंडिया कल्चर सोसायटीचे अध्यक्ष प्रा.डॉ. टोमियो मिझोकामी, जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. आर. एम. माशेलकर आणि सुप्रसिद्ध संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासन प्रमुख प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे असतील.

या प्रसंगी सिटी मॉन्टेसरी स्कूलचे संस्थापक व्यवस्थापक व मुख्य न्यायधीशांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे समन्वयक डॉ. जगदीश गांधी व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणचे अध्यक्ष डॉ. के.कस्तुरीरंगन यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात येणार आहे.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्‍वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने नॅशनल टिचर्स काँग्रेस भरविली जात आहे.

या परिषदेचा समारोप शुक्रवार, दि.१८ डिसेंबर रोजी दुपारी ४.३० वा. होणार आहे. केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री ना. श्री. महेंद्रनाथ पांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा हे अध्यक्षस्थानी असतील. माजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री श्री.कपिल सिब्बल व रिसर्च अ‍ॅण्ड इनोव्हेेशन सर्कल हैद्राबादचे महासंचालक डॉ. अजित रांगणेकर हे उपस्थित राहणार आहेत. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासन प्रमुख प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड व सुप्रसिद्ध संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे उपस्थित राहतील.

कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल टेक्नॉलॉजीचे संस्थापक व खासदार डॉ. अच्युत समंता यांना ‘जीवन गौरव पुरस्कारा’ ने सन्मानित करण्यात येणार आहे.


या चार दिवसीय परिषदेत एकूण ८ सत्रे असतील. त्यात विषय खालीप्रमाणे आहेत:

१. एनईपी २०२० च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन

२. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पाऊलः नॅशनल रिसर्च फाउंडेशन

३. मुक्त शिक्षणः सर्व विद्याशाखांना जोडणारा धागा

४. पूर्व प्राथमिक ते १२वीं शालेय शिक्षणाची नवी दिशा

५. ऑनलाईन आणि डिजिटल शिक्षण

६. शैक्षणिक तंत्रज्ञानः उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षणामध्ये मूलभूत परिवर्तन

७. भारतीय शिक्षणाचे जागतिकीकरण  

८. मान्यता, तौलनिक दर्जा आणि गुणवत्ता (आयआयटी, आयआयएम, आयआयएस आणि एआयआयएमएस)

याशिवाय विशेष अशा दोन ‘टीचर टू टीचर कनेक्ट’ व दोन पेपर प्रेझेंटेशन सत्र होणार आहेत.

या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, कला, पत्रकारिता आदी क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित केले आहे.

त्यामध्ये महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, आसामचे शिक्षण मंत्री डॉ. हिमंता बिस्वा शर्मा, हरियाणाचे शिक्षणमंंंंत्री कन्वरपाल, आंध्रप्रदेशचे शिक्षण मंत्री ऑडीमुलापु सुरेश, पंजाबचे शिक्षण मंत्री विजय इंद्रर सिंगला, तमिळनाडूचे शिक्षण मंत्री के.ए.सेनगोट्टीयान, अरूणाचल प्रदेशचे शिक्षण मंत्री ताबा तेदीर, राजस्थानचे शिक्षण मंत्री गोविंद सिंग दोतासरा, पश्‍चिम बंगालचे शिक्षण मंत्री डॉ.पार्थ चटर्जी, हिमाचल प्रदेशचे शिक्षण मंत्री गोविंदसिंग, कर्नाटकचे उपमुख्य मंत्री व शिक्षण मंत्री डॉ.अश्‍वथ नारायण सी.एन विशेष मार्गदर्शन करतील.

तसेच, आयआयएमबीचे संचालक प्रा.ऋषिकेशा टी. कृष्णन, कर्नाटकराज्याचे सचिव एम.के. श्रीधर, बॅनेट युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. रघुनाथ शेवगावकर, रायपूर येथील आयआयएमचे प्रा.डॉ.धनंजय बापट, आयसीएसएसआरच्या पब्लिकेशन अँण्ड रिसर्च सर्वेचे संचालक अजय कुमार गुप्ता, अरूणाचल प्रदेशचे शिक्षण मंत्री कुंगा निमा लेप्चा, ऋषिहुड युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अधिकारी साहिल अग्रवाल, फ्लेम युनिव्हर्सिटीच्या टिचिंग अँड लर्नींगच्या संचालक डॉ. माया दौड, एनसीआरटीचे संचालक श्रीधर श्रीवास्तव, सीबीएसई अ‍ॅकॅडमिकचे संचालक जोसेफ मॅन्युएल, शकीला शमसू, झेवियर गोन्सालीस, डॉ. विस्ताप कारभारी, डॉ. हेन्की, एसएनडीटी युनिव्हर्सिटीच्या एज्यूकेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या संचालिका जयश्री शिंदे, एमएचआरडीचे मुख्य अधिकारी डॉ. अभय जेरे, एज्युकेशन मल्टीमीडिया रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. समीर सहस्त्रबुद्धे, ओमीनीओ फ्यूचर अ‍ॅकॅडमीचे संचालक शिवकुमार बेलवडी, नवी दिल्ली येथील सीआयएससीईचे अध्यक्ष डॉ. इमॅन्यूअल, एआययूचे महासचिव डॉ. पंकज मित्तल, न्यूजीलँड युनिव्हर्सिटीच्या फायनेशियल एज्युकेशन अँण्ड रिसर्च सेंटरच्या संचालिका डॉ. पुष्पा ऊद, मिलर कॉलेज ऑफ बिजनेसचे सहयोगी अधिष्ठाता डॉ, सुशील शर्मा, डॉ. प्रदीप कुमार ब्लाण्ड, रत्नदीप गुलेरिया, डॉ. अश्‍विन फर्नाडिस आणि नॅकचे सल्लागार डॉ. गणेश हेगडे हे आपले विचार मांडतील.

विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी), नॅक, महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघ, असोसिएशन ऑफ इंडियन कॉलेज प्रिन्सिपॉल्स फेडरेशन, यूनेस्को , युनिसेफ , एआयसीटीई , असोशिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (एआययू), महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र प्राचार्य परिषद या भारतातील व महाराष्ट्रातील प्रमुख संस्था नॅशनल टीचर्स काँग्रेसच्या सहयोगी आहेत.

नॅशनल टीचर्स कॉग्रेस (एनटीसी) हा भारत व जगातील उच्च शिक्षणातील शिक्षकांसाठी एक बहुआयामी व्यासपीठ आहे. ही केवळ शैक्षणिक परिषद नसून शिक्षकांसाठी आंतरशाखीय ज्ञानाच्या देवाण घेवाणीची एक मोठी संधी आहे. भारतातील प्राचीन गुरू शिष्य परंपरा अनेक थोर शिक्षकांच्या योगदानाने प्रसिद्ध आहे. जगभरातील उच्च शिक्षणातील शिक्षकांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने याची संकल्पना आखली गेली आहे. चार दिवसांच्या चर्चासत्र आणि संवादाद्वारे हजारो शिक्षकांना प्रेरित करण्याचे आमचे लक्ष्य आहे.

आपल्या देशाला अनेक चांगल्या शिक्षकांची परंपरा आहे. त्यांनी आपल्या शिकविण्यातून प्रेम आणि आदर मिळविला. ध्येय, आदर्शवाद आणि निःस्वार्थी सेवा हीच त्यांची ओळख आहे. त्यातील अनेकांनी केवळ ज्ञान दिले, असे नाही तर मूल्ये आणि आदर्शांच्या सहाय्याने समाजाला एक दिशा दिली. अशाच राष्ट्रउभारणीच्या भावनेने भारलेल्या आणि केवळ शिक्षक म्हणून नाही, तर उत्तम संशोधक, संवेदनशील, समाजाभिमुख, प्रगतीशील, दिशादर्शक, प्रेरणादायी आणि तत्त्वनिष्ठ शिक्षकांची फळी निर्माण करण्याचे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.

अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र कुलगुरू प्रा.डॉ. आर.एम.चिटणीस, शिक्षणविभागाच्या संचालिका डॉ. सुहासिनी देसाई आणि स्कूल ऑफ एज्यूकेशनच्या प्रमुख डॉ. अर्चना चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सविस्तर माहितीसाठी www.nationalteacherscongress.com व www.mitwpu. <http://www.mitwpu.>edu.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.