स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना कोरोना योध्दा सन्मान 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



---------------कृपया प्रसिद्धी करीता-------------


स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना कोरोना योध्दा सन्मान 


कॅम्प: कर्तव्य फाउंडेशनतर्फे पुणे कँन्टोन्मेंट बोर्डाच्या मुक्तिधाम (धोबीघाट) स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना कोरोना योध्दा सन्मानाने गौरविण्यात आले. फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे,कार्याध्यक्ष अशोक देशमुख, डॉ. बंटी धर्मा, दिलीप भिकुले व सुनील बाथम यांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांना शाल व प्रशस्तीपत्रक प्रदान करून अन्नधान्य कीट भेट देण्यात आले.


  मुक्तिधाम स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी २०० हून अधिक कोरोना मृतांवर अत्यंसंस्कार केले आहेत त्याकरिता त्यांना गौरविण्यात आले असल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे यांनी सांगितले.तसेच या सर्व कोरोना योध्दंयाच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.तसेच पुणे कँन्टोन्मेंट बोर्डाने या कर्मचाऱ्यांना योग्य ते मानधन द्यावे अशी मागणीही त्यांनी केली.


सोबत- कार्यक्रमाचा फोटो


विकास भांबुरे (अध्यक्ष-कर्तव्य फाउंडेशन )