पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या लग्न सोहळ्याला अधिक आकर्षक बनवणार तष्ट वेडिंग हाऊस!*
- *छत्रपती शिवाजी महाराजांचे कलेक्शन सुरू करणारे तष्ट भारतातील पहिले पारंपरिक कपड्यांचे दुकान!*
यंदा सगळीकडेच लग्न सोहळे जोरदार पार पडत आहे. या लग्न मोसमात प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावेही लग्न बंधनात अडकणार आहे. पुण्याचे पहिले वेडिंग हाऊस (लग्न घर) म्हणून मान असलेले तष्ट हाऊस अभिनेत्री अभिज्ञा भावे हिच्या लग्न सोहळ्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी उत्साहाने पार पाडण्यासाठी सज्ज झाले आहे. तष्ट हे महाराष्ट्रीयन लग्न सोहळ्यांसाठी प्रसिद्ध असून अनेक सेलिब्रिटींची पसंती म्हणून तष्टची ओळख आहे. या वेडिंग हाऊसने यापूर्वी आयोजित केलेल्या भव्य महाराष्ट्रीयन विवाह सोहळ्याची मेजवानी केवळ पुणेकरांनीच नाही तर दुबई आणि लंडनच्या मंडळींनीही अनुभवली आहे.
अभिज्ञा भावेच्या लग्न सोहळ्यात तिला अधिक सुंदर बनवणारे कपडे आणि छायाचित्रणाची जबाबदारी तष्ट पार पाडणार आहे. अभिज्ञाच्या कपड्यांसाठी तष्टने तीन ते चार महिने मेहनत घेतली असून प्रत्येक पेहराव हा बारकाईने तयार केला आहे. या पेहरावावरील प्रत्येक नक्षीकामाला विशिष्ट अर्थ असून तो अभिज्ञाशी निगडित आहे. यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे लग्न सोहळ्यातील पेहरावासाठी अभिज्ञाचे वैयक्तिक अनुभव कपडे डिजाइन करताना वापरले आहे. त्यामुळे या कपड्यांच्या नक्षीकामाला भावनिक अर्थ आणि स्पर्श आहे.
या लग्न सोहळ्याला अधिक मोहक बनवण्यासाठी तष्टने
लग्न विधीसाठी अभिनेत्री अभिज्ञा भावेकरिता कमळाचे नक्षीकाम असलेली भरजरित हाताने तयार केलेली अस्सल सिल्क साडी तयार केली असून या खास साडीवरील नक्षीकाम हे शुद्धता, आत्मसुख आणि पुनर्जन्म याचे प्रतीक आहे. नववधूच्या कपड्यांना शोभून दिसण्यासाठी नवरदेव मेहुल पै यांचा अंगरखा नववधूच्या साडीच्या रंगासारखा डिजाइन केला असून त्यावर निळा शेला आणि फ्लोरल ऑर्गांझा कापडाचा फेटा तयार करण्यात आला आहे. तसेच रिसेप्शनसाठी अभिज्ञाकरिता अस्खलित बनारसी सोनेरी साडी निवडली असून हाताने तयार केलेला ब्लाऊज त्याला अधिक आकर्षक करणार आहे. या दिवशी नवरदेव निळ्या नवाबी थाटात तयार होणार असून त्यावर जदौ मोत्याच्या माळा घालून त्याला आधुनिक आणि पारंपरिक यांच्या मिश्रणाची जोड देणार आहे.
चार वर्षापूर्वी स्थापन केलेल्या तष्ट वेडिंग हाऊसने जगाच्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या प्रत्येक भारतीयांसाठी वैविध्यपूर्ण कपड्यांचे संग्रह (कलेक्शन) तयार केले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सन्मानित करण्यासाठी महाराजांचे कलेक्शन सुरू करणारे तष्ट हे भारतातील पहिले पारंपरिक कपड्यांचे दुकान आहे.
तष्ट वेडिंग हाऊसचे अध्यक्ष म्हणाले, आम्हाला अभिमान आहे की अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि मेहुल पै यांनी ६ जानेवारीला अथेना बँकवेट येथे होणाऱ्या त्यांच्या लग्न सोहळ्यासाठी आमची निवड केली. त्यांच्या आयुष्याला वळण देणाऱ्या या आनंदाला आमची कंपनी नक्कीच द्विगुणित करेल. तष्ट हाऊस हे विधी आणि रिसेप्शन या कार्यक्रमांसाठी कपडे तयार करते. मनाने सुंदर असणाऱ्या या जोडप्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठ्या दिवशी त्यांच्या आयुष्याची व्याख्या सांगणारे कपडे तयार करून देणे आणि हा लग्नाचा मोठा दिवस अधिक अविस्मरणीय करण्यासाठी तष्ट आणि टीम पूर्णपणे सज्ज आहे.