पुणे प्रवाह न्युज पोर्टल
“वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा,
मग आम्ही दाखवतो,”
म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान......
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, महाराष्ट्र सैनिक काय आहेत ? हे दाखवून देऊ असं आव्हान म.न.से. नेते संदीप देशपांडे यांनी पोलिसांना दिलं आहे.
वसईमध्ये पोलिसांनी कारवाई करताना म.न.से. कार्यकर्त्यांना मारहाण केल्याने संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त केला आहे.
संदीप देशपांडे यांनी व्हि.डी.ओ. शेअर करत थेट पोलिसांनाच आव्हान दिलं आहे.
यावेळी त्यांनी मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली आहे.
तसंच सरकारचे दलाल असल्यासारखे वागू नका सांगताना आझाद मैदानात काढलेल्या मोर्चाची आठवण करुन दिली.
संदीप देशपांडे यांनी काय म्हटलं आहे
– “आमचे महाराष्ट्र सैनिक आंदोलन करत असताना हात उचलणारे पोलीस आम्ही पाहिले.
पोलीस आमच्या कार्यकर्त्यांना आई-बहिणीवरुन शिव्या देत होते.
सरकारचे दलाल असल्यासारखं पोलिसांनी वागू नये.
सत्ता येते आणि सत्ता जाते…पोलिसांनी पोलिसांसारखं काम केलं पाहिजे.
तुम्ही कानाखाली मारलीत त्याचीही गरज नव्हती.
एवढा माज दाखवू नका.
पोलिसांनी सत्तेची दलाली करु नये.
एवढीच जर हिंमत असेल तर दोन तास तुमची वर्दी बाजूला ठेवा आणि आमच्याशी भिडा….मग आम्ही दाखवतो राज ठाकरेंचे कट्टर मनसैनिक काय आहेत ? ते…
जेव्हा तुमच्यावर हल्ला झाला तेव्हा तुमच्या संरक्षणासाठी आझाद मैदानावर आम्ही सर्वांनी मोर्चा काढला.
पोलिसांवर हात उचलायचा नाही ही राज ठाकरेंची शिकवण आहे म्हणून ही गोष्ट सहन करतोय.
ज्या हातांनी महाराष्ट्र सैनिकांना मारलंत त्याच हातांनी सलाम करायला लागेल हे पण लक्षात ठेवा,” असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.