कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या

 पुणै प्रवाह न्युज पोर्टल


कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या..

पोलादपूर:-  तालुक्यातील ऐतिहासिक कोंढवी किल्लय़ावर भैरवनाथ जोगेश्वरी मंदिराच्या जीर्णोद्धार समयी खोदकाम करतेवेळी शिवकाळातील १५ मुर्त्यां सापडल्या आहेत. 

तालुक्यातील आठगाव भैरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोंढवी येथे मंदिराचे काम करतेवेळी पाण्यासाठी पाण्याची टाकी बांधण्यासाठी खोदकाम करतेवेळी शिवकाळातील पंधरा मुर्त्यां सापडल्या या मूर्तीमध्ये भैरी ,जोगेश्व्री ,वाघजाई, वीर मूर्ती, तसेच गणेश मूर्ती इत्यादी मूर्तिंचा समावेश आहे. 

मोठय़ा प्रमाणात मुर्ति सापडल्यामुळे पोलादपूर तालुक्यासह कोकणातील भाविकांची या कोंढवी गडाकडे दर्शनासाठी रीघ लागली आहे.

 तालुक्यातील आठगाव भैरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोंढवी सह चोळई, गाजवणे, खडकवणे, धामणदेवी, फणसकोंड, गोलदरा, तळ्याचीवाडी या गावाचे आराध्य दैवत असलेल्या जोगेश्वरी मंदिराच्या पूर्व बाजू पाण्याची साठवण टाकी साठी खोदकाम करीत असताना या मुर्त्यां आढळून आले आहेत. 

या मुर्त्यां मध्ययुगीन व शिवकाळातील असून सदर मुत्यांमध्ये श्री गणेश, भैरी जोगेश्वरी वाघजाई वीर मुर्त्यां इत्यादींचा समावेश आहे.

 कोकण इतिहास परिषदेचे प्रा.अंजय धनावडे तसेच इतिहास संशोधक प्रवीण भोसले यांनी या मूर्त्यां संदर्भात या मुर्त्यां चौदाव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत असल्याचे नमूद केले आहे.

 सदर मुर्ती या अगोदर सुद्धा येथे शिव लिंगाखालील पीठ,दिवा,तसेच मध्ययुगीन भांडय़ांचे अवशेष सापडले आहेत. 

इतिहासकाळात आदिलशाही मध्ये पोलाद जंग नावाचा सरदार येथे कारभार पाहत होता त्यानंतर चंद्रराव मोरे यांची सत्ता होती चंद्रराव मोरे यांचा पाडाव करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला येथील भैरी जोगेश्वरी देवस्थान शिवकाळापासून प्रसिद्ध आहे.