मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त विकिपीडिया कार्यशाळा* 

प्रेस नोट


*मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त विकिपीडिया कार्यशाळा*


पुणे:


महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या' स्पोकन मराठी अकादमी' आणि' सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी 'तर्फे मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त ' मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा' आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा दि. ४ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत  झाली.


 विकिपीडिया संपादन मार्गदर्शक म्हणून  सुबोध कुलकर्णी उपस्थित होते.


मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने २०२० यावर्षी महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शासनाने सर्व संस्थाना आवाहन केले होते. याला प्रतिसाद म्हणून ही संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.


विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे ,यासाठी स्पोकन मराठी अकादमी, आझम कॅम्पस, पुणे आणि सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी यांनी पुढाकार घेतला.स्पोकन मराठी अकादमी च्या संचालिका नूरजहाँ शेख यांनी स्वागत केले..


................................................
 
.............


Popular posts
७१ व्या गणतंत्र - प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिन चिरायू व्होवो जय भारत ...जय महाराष्ट्र...... जयहिंद.
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*