ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
अधिकारी महासंघाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर बैठक सम्पन्न 
August 22, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 

 

अधिकारी महासंघाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर बैठक सम्पन्न

पुणे दि. 21- राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकारी शिष्टमंडळाची उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर सेवा निवृत्ती वय 58 वरून 60 करणे सम्बंधी व इतर मागण्या संदर्भात पुणे येथे शासकीय विश्राम गृह येथे चर्चा झाली. 

सेवानिवृत्ती वय 60 करणे संदर्भात त्यांनी महासंघाची भूमिका ऐकून घेतली. मुंबईत गेल्यावर वित्त विभागातील अधिकाऱ्यां समवेत चर्चा करून, शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

शिष्टमंडळामधे महसंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, राज्य सरचिटणीस विनायक लहाडे, पुणे सरचिटणीस विठ्ठल वाघमारे, पुणे उपाध्यक्ष तुळशीदास आंधळे, राज्य संघटक विलास हान्डे उपस्थित होते.