ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
अपंग बांधवाना व घरटं प्रकल्पातील अनाथ मुलांना रुपेश मोरे मित्र परिवारातर्फे सुका शिधा वाटप
September 17, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 

      अपंग बांधवाना व घरटं प्रकल्पातील अनाथ मुलांना रुपेश मोरे मित्र परिवारातर्फे सुका शिधा वाटप करण्यात आले . हडपसरमधील बंटर शाळेमधील घरटं प्रकल्पातील अनाथ मुलांना व अपंग बांधवाना हा सुका शिधा देण्यात आला .

       या कार्यक्रमाचे आयोजन अक्षय कोठावळे , रितेश मोरे व राजाभाऊ वासुंडे यांनी केले होते . कोरोनाच्या महामारीमध्ये सर्व लोकांची परिस्थिती गंभीर आहे . रुपेश मोरे यांनी आपल्या लग्नाचा खर्च कमी करून अपंग बांधवाना व अनाथ मुलांना सुका शिधा वाटप केले .

    कोरोना महामारीमध्ये गरजू , अपंग , अनाथ , वृध्द , हातावरचे पोट असणारे यांना आपल्या कुवतीप्रमाणे मदत करा व त्यांचे मनोबल वाढवा , असे आवाहन अक्षय कोठावळे यांनी केले .