ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
अयोध्या नगरीमध्ये श्री राम मंदिराचे भूमिपूजनानिमित्त ताराचंद ज्वेलर्स गृपच्यावतीने भारताच्या नकाशात  तिरंगा रांगोळी काढून भव्य दीपोत्सव साजरा
August 7, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 

 

 

अयोध्या नगरीमध्ये श्री राम मंदिराचे भूमिपूजनानिमित्त

ताराचंद ज्वेलर्स गृपच्यावतीने भारताच्या नकाशात

 तिरंगा रांगोळी काढून भव्य दीपोत्सव साजरा

 

 

 

अयोध्या नगरीमध्ये श्री राम मंदिराचे भूमिपूजनानिमित्त रास्ता पेठमधील ताराचंद ज्वेलर्स गृपच्यावतीने भारताच्या नकाशात तिरंगा रांगोळी काढून भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला . यावेळी नागरिकांना पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला . यावेळी फुलांच्या पाकळ्यांची सजावट करण्यात आली .

 

यावेळी अस्मि सोनी , संजय सोनी , ललिता सोनी , सिध्दी सोनी , सागर सोनी , विधी सोनी , विनोद पालरेशा, मायावती चित्रे व दौलतराव धेंडे आदी सहभागी झाले होते .

 

यावेळी संजय सोनी यांनी सांगितले कि , या जन्मी आम्हांला श्री राम मंदिर होत आहे याचा आनंद होत आहे . घरातील वडीलधारी ताराचंद सोनी यांची श्री राम मंदिर उभारण्याची इच्छा होती . ती आज प्रत्यक्षात अवतरली आहे . त्याचा आम्हांला आनंद झाला आहे . आज श्री राम मंदिरच्या उभारणीमुळे राष्ट्रीय एकात्मतेने जोडलो गेलो आहोत . हि भावना प्रत्येक भारतीयांमध्ये रुजली पाहिजे . यापुढे दरवर्षी श्री राम मंदिर उभारणीचा आनंदोत्सव दरवर्षी साजरा करणार आहोत .