ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
आम्ही आणू बाप्पा तुमच्या घरी गणेशोत्सव काळात पडद्यामागील कलाकारांसाठी स्टार प्रवाह वाहिनीचा अनोखा उपक्रम
August 20, 2020 • santosh sangvekar • मराठी / हिंदी सिनेमा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल

 

 

आम्ही आणू बाप्पा तुमच्या घरी

 

गणेशोत्सव काळात पडद्यामागील कलाकारांसाठी स्टार प्रवाह वाहिनीचा अनोखा उपक्रम

 

 

 

गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. कोरोनाच्या संकटकाळात यंदाच्या गणेशोत्सवाला बंधनांची मर्यादा आहे. त्यामुळेच स्टार प्रवाह वाहिनीने यंदाच्या गणेशोत्सवात एक महत्त्वाचं पाऊल उचलण्याचं ठरवलं आहे. या अनोख्या उपक्रमाअंतर्गत बाप्पाची मूर्तीच घरपोच करण्याचा निर्णय स्टार प्रवाह वाहिनीकडून घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे पडद्यामागील कलाकारांच्या घरी स्टार प्रवाह वाहिनी बाप्पाची मूर्ती सुखरुपरित्या पोहोचवणार आहे. मालिकेच्या निमित्ताने आपण कलाकारांना दररोज भेटत असतो. या कलाकारांना आपल्यापर्यंत पोहोचवण्यात सेटवरच्या तंत्रज्ञांचा आणि कामगारांचा खूप मोलाचा वाटा असतो. त्यांच्याशिवाय सेटवरच्या कामाचा श्रीगणेशा होत नाही असं म्हण्टलं तरी वावगं ठरणार नाही. प्रकाशझोतात न आलेल्या या खऱ्या हिरोंच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा स्टार प्रवाह वाहिनीचा प्रयत्न आहे. सरकारी सुचना आणि योग्य प्रकारे काळजी घेत स्टार प्रवाहच्या वतीने बाप्पाची मूर्ती या तंत्रज्ञांच्या घरी पोहोचवली जाणार आहे.