ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
आरर् आरर् खतरनाक चक्क नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील रस्ता गेला चोरीला, तत्कालीन सरपंच सदस्यांचा प्रताप, 
June 23, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 

 

रस्त्याचा शोध घेण्याची नागरिकांकडून कारवाईची मागणी , 

 

कर्जत दि. 21 गणेश पवार

 

                 जिल्ह्यातील सगळ्यात मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या ग्रामपंचायत नेरळ मध्ये आता एक चक्रावून सोडणारे प्रकरण समोर आले आहे. या ग्रामपंचायत हद्दीत ग्रामनिधीमधून केलेला एक रस्ताच चोरीला गेला आहे. एप्रिल २०१९ मध्ये नेरळ हेटकरआळी भागात एका काँक्रीट रस्त्याचे काम करून बिल काढण्यात आले होते मात्र आता तोरस्ताच त्या ठिकाणी नसल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडे तक्रार केली आहे. तसेच संबंधित रस्त्याचा शोध घेण्याची विनंती देखील केली आहे. दरम्यान रस्ता न करताच बिले काढल्याचे धक्कादायक बाब समोर आली असल्याने तत्कालीन सरपंच सदस्य यांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. 

 

                  नेरळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या हेटकरआळी भागात अजित सावंत यांचे घर ते सुगवेकर वाडा येथपर्यंत सिमेंट काँक्रीटचा रस्ता व गटार यांचे काम नव्याने करण्याचे होणार होते. यासाठी ग्रामनिधी मधून २ लाख ९० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती. हा रस्ता उत्तम झाला देखील पण तो केवळ कागदावरच. कारण प्रत्यक्षात हा रस्ता झालाच नसल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. तर ग्रामपंचायत नेरळ मधून या रस्त्यासाठी १४ मे २०१९ रोजी २ लाख ७५ हजार एवढे बिल देखील ठेकेदाराला अदा करण्यात आले आहे. पण या रस्त्याच्या कामासाठी शासकीय नियम अटींना तिलांजली देत काम करण्यात आल्याचे समोर आले आहे. कोणतेही कार्यरंभ आदेश व ठेकेदाराची नियुक्ती न करताच कामासाठी घिसाडघाई करण्यात आल्याचे समजते आहे. त्यामुळे रस्ता न करताच बिल काढले असल्याचे चित्र समोर आहे. तर रस्ता झाला तर रस्ता गेला कुठे ? असा प्रश उपस्थित करत स्थानिक ग्रामस्थ देवा गवळी यांनी रस्ता चोरीला गेल्याची तक्रार करत ग्रामपंचायतीला याबाबत तक्रारी अर्ज केला आहे. तेव्हा याबाबत आता याबाबत पंचायत समिती व जिल्हा परिषद येथील वरिष्ठ काय कारवाई करतात. तसेच पावणे तीन लाखांचा रस्ता गायब करणाऱ्यांवर कारवाई करणार का असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. दरम्यान या कामाचे मूल्यांकन करणाऱ्या पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंता असलेल्या मनीषा शीड यांच्याशी अधिक माहितीसाठी संपर्क केला असता त्यांच्या संपर्क होऊ शकला नाही. तर ज्यांचे या प्रकरणात नाव आले आहे असे माजी उपसरपंच केतन पोतदार यांची देखील संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. 

 

 

 हेटकरआळी भागात झालेल्या रस्त्याचे प्रकरण हे तत्कालीन सरपंच व सदस्य तसेच ग्रामसेवक यांच्या कार्यकाळातले आहे. या प्रकरणाची माहिती माझ्याकडे नाही. तेव्हा याबाबत चौकशी करून योग्य ती माहिती वरिष्ठाना कळविण्यात येईल. 

 

: एम.डी.गोसावी, ग्रामविकास अधिकारी नेरळ ग्रामपंचायत 

 

 

 सदर कामाचे बिल माझ्या नावावर काढण्यात आले. मला तीस हजार रुपये देऊन उर्वरित पैसे माजी उपसरपंच केतन पोतदार यांनी माझ्याकडून घेतले पण कसले पैसे आहेत हे देखील मला माहित नव्हते. एकंदर या कामाशी माझा काहीही संबंध नाही. 

 

: सलीम उस्मान सहा, ठेकेदार 

 

 

गेले अनेक वर्षे आम्ही इथे राहत आहोत. मात्र मागील साधारण १५ वर्षांपासून हा रस्ता आहे त्याच स्थितीत आहे. यावर कोणतेही काम करण्यात आलेले नाही. मात्र याठिकाणी ३ लाखांचा रस्ता झाल्याचे आम्हाला समजले आहे. मग रस्ता गेला कुठे ? हा रस्ता चोरीला गेला का ? यासाठी आम्ही ग्रामपंचायतीकडे तक्रारी अर्ज दिलेला आहे. 

: देवा गवळी, ग्रामस्थ, तक्रारदार