ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती अत्यंत नाजूक, 
September 25, 2020 • santosh sangvekar

पुणे प्रवाह न्युज पोर्टल

गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती अत्यंत नाजूक, 

रुग्णालयाची माहिती....

सिने अभिनेते कमल हसन यांनी रुग्णालयात जाऊन  बालसुब्रमण्यम यांची 

घेतली भेट 

चेन्नई :- प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. त्यांना करोनाची बाधा झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. M.G.M. रुग्णालयाने या संदर्भात एक पत्रक काढून ही माहिती दिली आहे. पी.टी.आय.ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. करोना झाल्याने त्यांना ऑगस्ट महिन्यातच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

 प्रसिद्ध गायक एस.पी. सुब्रमण्यम यांना करोनाची बाधा ऑगस्ट महिन्यातच झाली आहे. तेव्हापासून त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी त्यांची प्रकृती सुधारावी म्हणून प्रार्थना केली आहे. ५ ऑगस्ट रोजी एस. पी.बालसुब्रमण्यम यांना करोनाची बाधा झाली. त्यांनी एक व्हि.डी.ओ. पोस्ट करुन याबाबतची माहिती दिली होती. आता त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचं M.G.M. रुग्णालयाने दिली आहे.