ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
गुगल क्लासरूम विषयावर वेबिनारचे आयोजन*
June 13, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 

 

Press release

 

 

*

.......................

*अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीचा पुढाकार*

 

पुणे :

 

कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण प्रणालीच्या युगात उपयोगी पडणाऱ्या ' अध्ययन, अध्यापन प्रक्रियेत गुगल क्लासरूम चा उपयोग' या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीने त्यासाठी पुढाकार घेतला आहे.१४ आणि १७ जून रोजी हा वेबिनार होणार आहे. प्रा. राणी पोटावळे, रजत सय्यद, प्रा. प्राजक्ता जगताप, स्वप्नील दौंडे मार्गदर्शन करणार आहेत.

 

 

जीमेल द्वारे गुगल क्लासरुम चा वापर, अद्यापनाच्या साहित्याची निर्मिती, ऑनलाईन प्रश्नपत्रिकांची निर्मिती, तपासणी, ब्रेन स्टॉर्मिंग गेम्सची निर्मिती या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 

अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राचार्य आणि वेबिनारच्या संयोजक डॉ. किरण भिसे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

 

................................................