ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
तुळशीबागेतून चीनी माल हद्दपार करण्याचे आवाहन-
June 22, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल

 

तुळशीबाग व्यापारी असोसिएशन : व्यापा-यांनी चीनी मालाला दाखविली कच-याची टोपली

 

पुणे : कोरोनाचे संकट आणि लडाख सिमेवर जवानांवर केलेला भ्याड हल्ला याकरीता चीनचा निषेध करीत आम्ही चीनी माल विकणार नाही, तुम्हीही विकू नका, असे सांगत तुळशीबागेतून चीनी माल हद््दपार करण्याचे आवाहन तुळशीबाग व्यापारी असोसिएशनने दुकानदारांना केले. तुळशीबागेतील चीनी मालाची विक्री बंद करुन चीनी माल लवकरच तुळशीबागेतून हद््दपार होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. 

 

तुळशीबाग गणपती मंदिरासमोर असोसिएशनतर्फे चीनी माल कच-याच्या टोपलीत टाकून चीनचा निषेध करण्यात आला. यावेळी पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष नगरसेवक हेमंत रासने, पराग ठाकूर, सुनील इनामदार, नितीन पंडित, संजीव फडतरे, मोहन साखरिया, दुर्गेश नवले, किरण चव्हाण, प्रदीप इंगळे, राजेश बारणे, राजेंद्र धावडे, अरविंद तांदळे आदी उपस्थित होते.  

 

हेमंत रासने म्हणाले, तुळशीबाग ही जुन्या बाजारपेठांपैकी एक बाजारपेठ आहे. केवळ पुण्यातूनच नव्हे, तर संपूर्ण देशातील पर्यटक येथे भेट देतात. चीनने लडाख सिमेवर भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला असून तुळशीबागेतून चीनी माल हद््दपार करुन आपण चीनचा निषेध करायला हवा. 

 

असोसिएशनचे नितीन पंडित म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुळशीबागेतील दुकाने ३ महिन्यांनी उघडली आहेत. विस्कटलेली आर्थिक घडी सुरळीत झालेली नाही, अशा परिस्थितीत व्यापा-यांना विश्वासात घेऊन चीनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आम्ही आवाहन केले आहे. काही व्यापा-यांनी चीनी माल रस्त्यावर फेकला असून अनेक व्यापारी चीनी माल परत पाठविणार आहेत. त्यामुळे तुळशीबागेतून लवकरच चीनी माल हद्दपार होईल, असेही त्यांनी सांगितले. 

 

* फोटो ओळ : तुळशीबाग व्यापारी असोसिएशनतर्फे तुळशीबाग गणपती मंदिरासमोर चीनी माल कचरापेटीत टाकून चीनचा निषेध करण्यात आला. हातात तिरंगी झेंडा घेत तुळशीबागेतून चीनी माल लवकरच हद््दपार होईल, असा विश्वास व्यापा-यांनी यावेळी व्यक्त केला.