ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
दातृत्व ही भारत देशाची महान संस्कृती आहे - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
August 14, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 

 

 

अवयवदान प्रोत्साहन व जनजागृती अभियानाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन

 

 

पुणे, दि. १३ ऑगस्ट २०२० : 

दातृत्व ही या देशाची महान संस्कृती असून वर्तमान आणि भविष्यात अवयवदान या दातृत्वाचे महत्व ठळकपणे समजून घेणे आवश्यक आहे. मानवी जीवनात याला महत्वाचे स्थान असून अवयव निकामी झाल्यामुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी अवयवदान संस्कृतीला पुनरुज्जीवित करणे आवश्यक असल्याचे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या अवयवदान प्रोत्साहन व जनजागृती अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

हे अभियान दिनांक १३ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२० या कालावधीत आयोजित करण्यात आले असून विद्यापीठ परिसर तसेच संलग्नित महविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या अभियानात सहभागी होणार आहेत. 

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची माहिती सांगितली. विद्यापीठ नेहमीच समाजपयोगी उपक्रमांचे आयोजन करीत असते, त्यामुळेच आज काही तासात २ हजारहून अधिक अवयवदान करणाऱ्या व्यक्तींची नोंद झाली असून पुढील सात दिवसात याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

तर व्यवस्थापन परिषदेचे; माननीय राज्यपाल नियुक्त सदस्य व विद्यार्थी विकास मंडळ तथा राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी उपक्रम समितीचे अध्यक्ष राजेश पांडे यांनी संकटकाळी विद्यार्थ्यांची कृतिशीलता व समाजपयोगी बाबीत पुढे होऊन उत्साहाने काम करण्याच्या सकारात्मक योगदानाविषयी माननीय राज्यपाल महोदयांना माहिती दिली. तसेच याप्रसंगी अवयवदानाचा संकल्प करून स्वयंप्रतिज्ञा घेतलेल्या वैष्णवी पाटोळे या विद्यार्थिनीचे विशेष कौतुक केले. 

 

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, डॉ. संजय चाकणे, प्रसेनजीत फडणवीस, डॉ. महेश अबाळे, डॉ.विलास उगले, अधिष्ठाता डॉ.संजीव सोनावणे, डॉ. मनोहर चासकर, डॉ.पराग काळकर , डॉ. अंजली कुरणे, अधिसभा सदस्या बागेश्री मंठाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

 

या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका वैष्णवी पाटोळे यांना अवयवदान संकल्पाचे प्रमाणपत्र माननीय राज्यपालांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात प्रदान करण्यात आले. कोविड संकट काळात सर्व विद्यार्थ्यांनी उभारलेल्या मदत व सेवा कार्याबद्दल विद्यापीठ क्षेत्रातील सर्व स्वयंसेवकांची प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेल्या वैष्णवीचे यांचे माननीय राज्यपाल यांनी विशेष कौतुक केले. 

 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी केले, आभार कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी मानले तर सूत्रसंचलन विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे यांनी केले.